Breaking News

1/breakingnews/recent

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे साधला जनतेशी संवाद

No comments

मुंबई -
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ आणि संचारबंदी लागू करण्यात आली. सर्व राजकीय नेते घरीच आहेत ते देखील घरीच बसून आपलं कामकाज पार पडत आहेत . फेसबुक लाइव्हद्वारे ते जनतेशी संवाद साधत आहेत वारंवार जनतेला घरी राहण्याचे आवाहन देत आहेत . त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला . सर्व जनतेला त्यांनी घरी बसून प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले . वारंवार सांगून देखील लोक बाहेर पडत आहेत. पोलीस किती लोकांना थांबवणार ? असा सवाल त्यांनी जनतेला केला . यासाठी आपणच आपल्याला शिस्त लावूया आणि प्रशासनाला सहकार्य करुया असे ते म्हणाले.
जे लोक बाहेर आहेत त्यांनी त्याच ठिकाणी थांबावे सुरक्षित राहावे .अडचणींचा काळात तुम्ही माझ्याशी फेसबुक , ट्विटरद्वारे संवाद साधू शकता असेही ते म्हणाले . जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व लॉकडाउन केलं असलं तरी लोक दुकानात , भाजी मार्केट मध्ये गर्दी करताना दिसत आहेत तरी त्यांनी ह्या संबंधी खबरदारी घ्यावी . दुकानात , भाजीमार्केट मध्ये गर्दी करू नये, अनेक ठिकाणी रकाने आखून दिले आहेत त्यातच राहून त्यांनी व्यवहार करावा , त्यांनी स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *