Breaking News

1/breakingnews/recent

४फेब्रुवारी-नितेश राणेंना जेल की बेल?

No comments




NEWS24सह्याद्री 

संतोष परब  हल्लाप्रकरणी दोन दिवस  पोलीस कोठडीत काढल्यानंतर नितेश राणेंना जामीन मिळणार? की कोठडीतला त्यांचा मुक्काम वाढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जिल्हा न्यायालयानं सुनावलेली पोलीस कोठडी आज संपत असल्यानं नितेश राणेंना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.त्याचबरोबर सिंधुदुर्ग पोलिसांकडून कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

दरम्यान काल पोलिसांनी नितेश राणे यांची सुमारे दोन तास चौकशी केली. याच प्रकरणातील दुसरे आरोपी राकेश परब आणि नितेश राणेंची समोरासमोर बसवून चौकशी केल्याचं कळतंय. राकेश परब हे नितेश राणेंचे पीए आहेत. यांच्यासमोर बसवूनही या दोघांची पोलिसांनी चौकशी केली. काल राणेंचे वकील संग्राम देसाईंनीही त्यांची भेट घेतली. राकेश परब यांच्या मार्फत नितेश राणे हल्लेखोर सचिन सातपुतेंच्या संपर्कात होते का? याबाबतची पोलिसांनी चौकशी केल्याचं कळतंय. आज न्यायालयात हजर केल्यानंतर नितेश राणेंना जामीन मिळतो की त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढतो हे पाहावं लागेल.

संतोष परब हल्लाप्रकरणी दोन दिवस  पोलीस कोठडीत काढल्यानंतर नितेश राणेंना जामीन मिळणार? की कोठडीतला त्यांचा मुक्काम वाढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जिल्हा न्यायालयानं सुनावलेली पोलीस कोठडी आज संपत असल्यानं नितेश राणेंना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल. सिंधुदुर्ग पोलिसांकडून कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

दरम्यान काल पोलिसांनी नितेश राणे यांची सुमारे दोन तास चौकशी केली. याच प्रकरणातील दुसरे आरोपी राकेश परब आणि नितेश राणेंची समोरासमोर बसवून चौकशी केल्याचं कळतंय. राकेश परब हे नितेश राणेंचे पीए आहेत. यांच्यासमोर बसवूनही या दोघांची पोलिसांनी चौकशी केली. काल राणेंचे वकील संग्राम देसाईंनीही त्यांची भेट घेतली. राकेश परब यांच्या मार्फत नितेश राणे हल्लेखोर सचिन सातपुतेंच्या संपर्कात होते का? याबाबतची पोलिसांनी चौकशी केल्याचं कळतंय. आज न्यायालयात हजर केल्यानंतर नितेश राणेंना जामीन मिळतो की त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढतो हे पाहावं लागेल.

नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या मोबाईलवरून आमदार नितेश राणे यांचं आरोपींशी संभाषण झालं आहे. त्यामुळे समोरासमोर बसवून,चौकशी करायची आहे म्हणून पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद  सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला. सरकारी वकिलांच्या युक्तीवांदानंतर पोलिस कोठडीला नितेश राणेंच्या वकिलांनी विरोध केला. नितेश राणेंचे वकिल म्हणाले,  आम्ही तपासात सहकार्य  केले आहे. 


आमदार नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयाला शरण आल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मात्र दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली होती. 


नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. नितेश राणे यांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. नितेश राणे यांनी 10 दिवसांत  सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज करणार होते. परंतु, अचानक निर्णय बदलत ते जिल्हा सत्र न्यायालयाला शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालीन कोठडी सुनवण्यात आली.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. 




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *