Breaking News

1/breakingnews/recent

११फेब्रुवारी-किरीट सोमय्या यांचा पुन्हा पुणे दौरा

No comments

NEWS24सह्याद्रि 

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत.गेल्या आठवड्यात किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती त्यामुळे पुणे महापालिकेच्या आवारात पुणे पोलिसांच्यावतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

  गेल्याच  आठवड्यात किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. भाजपनं त्याच पायऱ्यांवर किरीट सोमय्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. या सत्काराला काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे. काँग्रेस सोमय्यांचा विरोध करणार त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पुणे महापालिका परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.आज दुपारी 4 वाजता किरीट सोमय्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून आता चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *