Breaking News

1/breakingnews/recent

४फेब्रुवारी-लोणावळा पोलिसांच्या सर्तकतेमुळं टळला दरोडा

No comments

 


NEWS24सह्याद्री 

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी सोहेल जावेद शेख, ओमकार सिंग अवतार सिंह आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

     पिंपरी शहरात गेल्या काही दिवसात दरोडा घालणाऱ्या टोळया सक्रिय झाल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पेट्रोलपंपासह इतर ठिकाणी दरोडा टकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सापाळा रचून अटक केली होती. त्यानंतर मध्यप्रदेशातून आलेल्या दरोडेखोराच्या टोळीतील सात जणांनाही पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकत पकडले होते. दरोडेखोर व पोलिसाच्यात झालेल्या गोळीबारही झाला होता. यामध्ये दरोडेखोराच्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचारीही जखमीही झाला होता. त्यानंतर आता लोणावळा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी सोहेल जावेद शेख, ओमकार सिंग अवतार सिंह आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलीस मध्यरात्री जुना खंडाळा टाटा डक लाईन परिसरात पेट्रोलिंग करीत होते . त्याच दरम्यान टाटा डीपी रूमच्या जवळसंशयास्पद हालचाली पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी सतर्क होत चौकशीसाठी जात असताना आरोपीनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *