Breaking News

1/breakingnews/recent

७ फेब्रुवारी-सदाभाऊ खोत यांचा शिवसेनेला खोचक शब्दात टोला

No comments

 

NEWS24सह्याद्रि

कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार? असा खोचक शब्दात सदाभाऊ खोत यांनी खोचक शब्दात शिवसेनेला टोला लगावला,सदाभाऊ खोत गोव्यातही  भाजपच्या मदतीला पोहोचले आहेत. त्यांनी गोव्यातही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.वाझोट्यांना लेकरं होत नसतात म्हणत घणाघात देखील केला आहे.

पाच राज्यात सध्या निवडणुकांचा प्रचार  अंतिम टप्प्यात आला आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्ष पायला भिंगरी बांधून प्रचारात उतरले आहेत. राज्यात भाजपचे सहयोगी असणारे सदाभाऊ खोत गोव्यातही  भाजपच्या मदतीला पोहोचले आहेत. त्यांनी गोव्यातही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. वाझोट्यांना लेकरं होत नसतात म्हणत घणाघात केला आहे. त्यांनी गोव्यात संजय राऊतांचाही समाचार घेतला आहे. जनतेच्या मनामध्ये आहे जे केंद्रमध्ये सरकार आहे ते राज्यामध्ये असले पाहिजे, असे म्हणत गोव्यात बीजेपीची सत्ता येणार नाही असं म्हणणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को अशी परिस्थिती आहे. राऊतांना वाईनचा रोज डोस जास्त होत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बोलत असतात त्यामुळे आता गुळाचे वाईन देखील राज्यात सुरू करावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *