Breaking News

1/breakingnews/recent

११ फेब्रुवारी-व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी प्रेक्षकांना गिफ्ट

No comments

 

NEWS24सह्याद्रि 

फेब्रुवारी महिना हा अनेक युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देण, डेटवर जाणं, समुद्रकिनारी बसून गप्पा मारणे अशा अनेक माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करतात, या महिन्याचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि येत्या 14 फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' चे अजून एक  खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे याच दिवशी झी म्युझिक मराठी घेऊन येत आहे.

एक नवीन मराठी म्युझिक अल्बम ‘नको हा बहाणा’  या गाण्यामध्ये अभिनेता निखिल चौधरी  आणि अभिनेत्री गायत्री दातार  यांची गोड जोडी प्रेक्षकांना बघायला मिळेल, या गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून सोशल मिडीयावर या गाण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे. गायत्रीनं निखिल आणि तिचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'जिवनात एक क्षण असा यावा.तुझ्या ओठावर हसु आणि माझा जिव जावा.'

निमिषा चौधरी प्रस्तुत, सौरभ चौघुले दिग्दर्शित ‘नको हा बहाणा’ या गाण्याला देव अहिरराव यांनी गायले असून, या गाण्याचे संगीतही त्यांचेच आहे. संकेत जाधव यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. तर राहुल दास यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *