Breaking News

1/breakingnews/recent

६ फेब्रुवारी -“गोव्यात मुख्य विरोधक शिवसेना,आप, टीएमसी नाही,तर”;मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं वक्तव्य..

No comments


NEWS24सह्याद्रि 

गोव्यात पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी मिशन २०२२ साठी तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, आप, टीएमसी हे पक्ष राजकीय आखाड्यात उतरले आहेत. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपली भूमिका मांडली आहे.

 “लोक आमच्या बरोबर आहेत. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी मला विश्वास आहे. परत एकदा भाजपाचं सरकार गोव्यामध्ये स्थापन होईल. गोव्या मुख्यत: विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष आहे. बाकी कोणी विरोधक असणार नाही. प्रथम राज्य म्हणून मी काम करत आहे. राज्याच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक मानसाला मी घरी पाठवले आहे.”

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *