Breaking News

1/breakingnews/recent

४ फेब्रुवारी- भिडू का बड्डे!

No comments

NEWS24सह्याद्रि 

साल 1980 आणि 1981. बॉलिवुडमध्ये एकिकडे अमिताभ बच्चन यांचे शान, लावारीस, शक्ती, सत्ते पे सत्ता, नसीब असे हिट सिनेमे येत होते. दुसरीक़डे समांतर सिनेमांचाही हा सुवर्णकाळ सुरू होता. इंडस्ट्रीत प्रस्थापितांची संख्या इतकी होती, की या गर्दीत स्टार किड्स शिवाय घुसणं जरा अवघडच होतं. अशावेळी वाळकेश्वरच्या तिन बत्तीमधल्या एका चाळीत राहणारा हा भिडू सिनेमात आला. जिथे हिरोंच्या ओठांवर मिशा वर्ज्य होत्या. तिथे आपल्या झुपकेदार मिशा मिरवत हा उंच पुरा, सळपातळ,  देखणा जयकिशन बॉलिवुडचा हिरो बनला. "नसिब.... सब नसिब का खेल है भिडू...." जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल आपण बोलतोय.. आज अपने भिडू का बड्डे है.

     एका दिवसात आयुष्य बदलू शकते, याचं जीवंत उदाहरण आहे आपले जग्गू दादा. चाळीत राहणारा, एटीकेटी देत दहावी पास झालेला आणि वडिलांच्या ओळखीनं कुठेतरी किरकोळ काम करणारा जग्गू दादा बसस्टॉपवर उभा होता. एक अनोळखी माणूस येतो,  मॉडेलिंगची ऑफर देतो. जग्गू दादा फोटो काढतात आणि हातात 7 हजार रुपयांचा चेक पडतो. मॉडेलिंगचा तो फोटो देव आनंद यांनी बघितला आणि दुसऱ्या दिवशी जग्गू दादा देव आनंद यांच्या समोर उभा होता. देव आनंद यांनी छोटासा का होईना, स्वामी दादा सिनेमात आपल्या भिडूला रोल दिला. पण हिरा कोळशातही चकाकतोच. तो काही मिनिटांचा रोल बघून दिग्दर्शक सुभाष घई जग्गू दादांकडे चालत आले आणि सिनेमासाठी साईन केलं. चित्रपट होता 'हीरो' एका रात्रीत तिन बत्तीत भाईगिरी करणारा जग्गू दादा सुपरस्टार हीरो जॅकी श्रॉफ बनला.

मी सुरुवातीला नशीब, नशीब म्हणलो ते यासाठीच. 'हिरो' सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर जॅकी श्रॉफ यशाची एक एक पायरी कायम वर चढत गेले. जग्गू दादा कितीही मोठे झाले तरी त्यांनी त्यांचं स्टारडम कधीच मिरवलं नाही. एका पेक्षा एक हिट सिनेमे देत असतानाही जग्गू दादांनी आपली चाळीतली ती छोटीशी खोली कधीच सोडली नाही. आपल्या चाळीतल्या लोकांवर त्याचं प्रेम होतं आणि आजही आहे. याच काळात त्यांनी आपली बालमैत्रिण आणि गर्भश्रीमंत घरातून आलेल्या आयेशा दत्त हिच्याशी विवाह केला. बंगल्यात राहणाऱ्या आयेशानं चाळीत जग्गू दादांना साथदिली.

हीरो सिनेमानंतर नंतर तेरी मेहेरबानिया, अल्ला रखा, कर्मा असे एका पाठोपाठ हिट सिनेमे देऊन सुपरस्टार असलेला जग्गू दादा चाळीतल्या शौचालयासमोर रांगेत उभा राहात होता. त्यांना ती चाळ, ती माणसं सोडवत नव्हती. विधू विनोद चोप्रा यांनी परिंदा सिनेमासाठी आणि महेश भट्ट यांनी काश या सिनेमांसाठी जग्गू दादांना याच चाळीत जाऊन साईन केलं होतं. यातच या माणसाचं मोठेपण आहे. दान धर्म करण्यात ते कायम पुढे असतात, कारण ती गरीबी त्यांनी भोगली आहे. ही प्रचंड संवेदनशीलता जॅकी श्रॉफ यांच्यामध्ये आली त्याचं कारण जग्गू दादांच्या बालपणात आहे.

जग्गू दादांची आई कझाकिस्तानची. तिथल्या गृहयुद्धात अनेक लोकांचं स्थलांतर झालं. जथ्थेच्या जथ्थे भारतात येऊ लागले. त्यात जग्गू दादांची आई सुदधा होती. कझाकिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान मार्गे त्या दिल्ली आणि नंतर मुंबईत आल्या. मुंबईत त्यांची ओळख जग्गू दादांचे वडील काकूभाई श्रॉफ यांच्यासोबत झाली. दोघांमध्ये प्रेम जडलं आणि विवाह झाला. काकूबाई हे गुजराती कुटुंबातले. वडिलांनी घराबाहेर काढलं होतं, म्हणून त्यांनी तीन बत्तीतल्या चाळीत संसार थाटला. दोन मुलं झाली. मोठा हेमंत आणि धाकटा जयकिशन. एक दिवस हेमंतचा पोहताना बुडून मृत्यू झाला. भावाचा हा मृत्यू जग्गू दादांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला,  याचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला.

जग्गू दादांचे वडील काकूभाई हे ज्योतिष शास्त्रात पारंगत होते. "तुम्ही यशस्वी उद्योजक व्हाल" असं भविष्य त्यांनी धिरुभाई अंबानींना सांगितलं होतं. पुढे धिरुभाई किती मोठे झाले, हे आपण पाहिलंच. तसंच जयकिशनलाही त्यांनी सल्ला दिला, "मास मीडियामध्ये जा तुला प्रचंड यश लाभेल." पण जग्गू दादांना कळेना, मास मीडिया म्हणजे काय ?  त्यांनी एअरलाईन्स कंपनीमध्ये ट्राय केलं,  अपयश आलं. शेफ बनण्याचा प्रयत्न केला, तिथेही अपयश आलं. शेवटी कंटाळून काकूभाईंच्या ओळखीतून एका डायमंड कंपनीत नोकरी मिळवली. तिथेच कामावर जाताना जग्गू दादांचं नशीब पालटलं. बस स्टॉपवर आलेला तो व्यक्ती, त्यानं मॉडेलिंगची दिलेली ऑफर, तोच फोटो बघून  देव आनंद साहेबांशी भेट आणि नंतर सुभाष घईंचा हिरो.

जॅकी दादानं आपल्या सिने कारकीर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिले. त्यांनी जवळपास सर्वच दिग्दर्शकांसोबत काम केलं. पण सुभाष घईंनी जग्गू दादांच्या सिनेकारकीर्दीला तार चांद लावले. जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर ही जोडी म्हणजे सिनेमा हिट होण्याचा फॉर्म्युला होता. परिंदा सिनेमात सीन परफेक्ट व्हावा यासाठी जग्गू दादांनी अनिल कपूरला 17 वेळा कानाखाली मारल्याचा किस्सा सर्वश्रूत आहे.

80 चा उत्तरार्ध आणि 90चं दशक. हा असा काळ होता जेव्हा गावागावात लोकांच्या घरात टीव्ही येऊ लागला होता. तेव्हा शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस रात्री सिनेमा लागायचा. जग्गू दादा आमच्या पिढीला भेटला तो याच ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्क्रीनवर. तेरी मेहेरबानिया,  कर्मा,  दुध का कर्ज,  त्रिदेव, परिंदा, खलनायक, राम लखन असे एक से एक सिनेमे बघायचो. राम लखनमधला खाकी वर्दीतला तो रुबाबदार पणा पाहून वाटायचं मोठं झाल्यावर पोलीस बनायचे आणि अशाच मिशा ठेवायच्या. जॅकी श्रॉफ हा सर्वसामान्यांचा हीरो होता. तो कायम आपला वाटत आला. आपलं स्टारडम त्यानं कधीच इतर कलाकारांवर गाजवलं नाही. हीरो सिनेमातल्या बासरीच्या त्या पीसला आणि तेरी मेहेरबानिया सिनेमातल्या कुत्र्यालाही ते आपल्या यशाचं क्रेडिट देतात.

गरीबी,  भूक आणि जगण्याच्या संघर्षानं जग्गू दादांना इतकं संवेदनशील बनवलंय की ते गोरगरिबांच्या मदतीला कायम पुढे असतात. नानावटी हॉस्पिटलमध्ये जग्गू दादांचं अकाउंट आहे. ज्या माध्यमातून गोरगरीबांवर उपचार केले जातात. आजही ते रस्त्यावरून फिरतात, लोकांना भेटतात. सेल्फी देतात. 'भिडू.. एक झाड लगानेका' असा प्रेमळ आग्रह करतात. शेकडो लोकांच्या दुवा जग्गू दादांच्या पाठीशी आहेत. माणसाचं मोठेपण यातच असतं, जो आपलं मूळ विसरत नाही. एका फोनवर ते मदतीला धावून जातात. करोडोंच्या बंगल्यात राहूनही वेळ मिळेल तेव्हा आपल्या तीन बत्तीच्या चाळीत जातात. तिथल्या अड्ड्यावर जुन्या मित्रांमध्ये बसतात. गप्पांचे फड रंगवतात. दोन चार सिनेमात काम करून स्टारडम डोक्यात जाणार्या इंडस्ट्रीत जग्गू दादांसारखा सुपरस्टार आहे हे पुढच्या पिढ्यांना सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. आपल्या भिडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. भिडू का बड्डे!

साल 1980 आणि 1981. बॉलिवुडमध्ये एकिकडे अमिताभ बच्चन यांचे शान, लावारीस, शक्ती, सत्ते पे सत्ता, नसीब असे हिट सिनेमे येत होते. दुसरीक़डे समांतर सिनेमांचाही हा सुवर्णकाळ सुरू होता. इंडस्ट्रीत प्रस्थापितांची संख्या इतकी होती, की या गर्दीत स्टार किड्स शिवाय घुसणं जरा अवघडच होतं. अशावेळी वाळकेश्वरच्या तिन बत्तीमधल्या एका चाळीत राहणारा हा भिडू सिनेमात आला. जिथे हिरोंच्या ओठांवर मिशा वर्ज्य होत्या. तिथे आपल्या झुपकेदार मिशा मिरवत हा उंच पुरा, सळपातळ,  देखणा जयकिशन बॉलिवुडचा हिरो बनला. "नसिब.... सब नसिब का खेल है भिडू...." जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल आपण बोलतोय.. आज अपने भिडू का बड्डे है.

     एका दिवसात आयुष्य बदलू शकते, याचं जीवंत उदाहरण आहे आपले जग्गू दादा. चाळीत राहणारा, एटीकेटी देत दहावी पास झालेला आणि वडिलांच्या ओळखीनं कुठेतरी किरकोळ काम करणारा जग्गू दादा बसस्टॉपवर उभा होता. एक अनोळखी माणूस येतो,  मॉडेलिंगची ऑफर देतो. जग्गू दादा फोटो काढतात आणि हातात 7 हजार रुपयांचा चेक पडतो. मॉडेलिंगचा तो फोटो देव आनंद यांनी बघितला आणि दुसऱ्या दिवशी जग्गू दादा देव आनंद यांच्या समोर उभा होता. देव आनंद यांनी छोटासा का होईना, स्वामी दादा सिनेमात आपल्या भिडूला रोल दिला. पण हिरा कोळशातही चकाकतोच. तो काही मिनिटांचा रोल बघून दिग्दर्शक सुभाष घई जग्गू दादांकडे चालत आले आणि सिनेमासाठी साईन केलं. चित्रपट होता 'हीरो' एका रात्रीत तिन बत्तीत भाईगिरी करणारा जग्गू दादा सुपरस्टार हीरो जॅकी श्रॉफ बनला.

मी सुरुवातीला नशीब, नशीब म्हणलो ते यासाठीच. 'हिरो' सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर जॅकी श्रॉफ यशाची एक एक पायरी कायम वर चढत गेले. जग्गू दादा कितीही मोठे झाले तरी त्यांनी त्यांचं स्टारडम कधीच मिरवलं नाही. एका पेक्षा एक हिट सिनेमे देत असतानाही जग्गू दादांनी आपली चाळीतली ती छोटीशी खोली कधीच सोडली नाही. आपल्या चाळीतल्या लोकांवर त्याचं प्रेम होतं आणि आजही आहे. याच काळात त्यांनी आपली बालमैत्रिण आणि गर्भश्रीमंत घरातून आलेल्या आयेशा दत्त हिच्याशी विवाह केला. बंगल्यात राहणाऱ्या आयेशानं चाळीत जग्गू दादांना साथदिली.

हीरो सिनेमानंतर नंतर तेरी मेहेरबानिया, अल्ला रखा, कर्मा असे एका पाठोपाठ हिट सिनेमे देऊन सुपरस्टार असलेला जग्गू दादा चाळीतल्या शौचालयासमोर रांगेत उभा राहात होता. त्यांना ती चाळ, ती माणसं सोडवत नव्हती. विधू विनोद चोप्रा यांनी परिंदा सिनेमासाठी आणि महेश भट्ट यांनी काश या सिनेमांसाठी जग्गू दादांना याच चाळीत जाऊन साईन केलं होतं. यातच या माणसाचं मोठेपण आहे. दान धर्म करण्यात ते कायम पुढे असतात, कारण ती गरीबी त्यांनी भोगली आहे. ही प्रचंड संवेदनशीलता जॅकी श्रॉफ यांच्यामध्ये आली त्याचं कारण जग्गू दादांच्या बालपणात आहे.

जग्गू दादांची आई कझाकिस्तानची. तिथल्या गृहयुद्धात अनेक लोकांचं स्थलांतर झालं. जथ्थेच्या जथ्थे भारतात येऊ लागले. त्यात जग्गू दादांची आई सुदधा होती. कझाकिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान मार्गे त्या दिल्ली आणि नंतर मुंबईत आल्या. मुंबईत त्यांची ओळख जग्गू दादांचे वडील काकूभाई श्रॉफ यांच्यासोबत झाली. दोघांमध्ये प्रेम जडलं आणि विवाह झाला. काकूबाई हे गुजराती कुटुंबातले. वडिलांनी घराबाहेर काढलं होतं, म्हणून त्यांनी तीन बत्तीतल्या चाळीत संसार थाटला. दोन मुलं झाली. मोठा हेमंत आणि धाकटा जयकिशन. एक दिवस हेमंतचा पोहताना बुडून मृत्यू झाला. भावाचा हा मृत्यू जग्गू दादांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला,  याचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला.

जग्गू दादांचे वडील काकूभाई हे ज्योतिष शास्त्रात पारंगत होते. "तुम्ही यशस्वी उद्योजक व्हाल" असं भविष्य त्यांनी धिरुभाई अंबानींना सांगितलं होतं. पुढे धिरुभाई किती मोठे झाले, हे आपण पाहिलंच. तसंच जयकिशनलाही त्यांनी सल्ला दिला, "मास मीडियामध्ये जा तुला प्रचंड यश लाभेल." पण जग्गू दादांना कळेना, मास मीडिया म्हणजे काय ?  त्यांनी एअरलाईन्स कंपनीमध्ये ट्राय केलं,  अपयश आलं. शेफ बनण्याचा प्रयत्न केला, तिथेही अपयश आलं. शेवटी कंटाळून काकूभाईंच्या ओळखीतून एका डायमंड कंपनीत नोकरी मिळवली. तिथेच कामावर जाताना जग्गू दादांचं नशीब पालटलं. बस स्टॉपवर आलेला तो व्यक्ती, त्यानं मॉडेलिंगची दिलेली ऑफर, तोच फोटो बघून  देव आनंद साहेबांशी भेट आणि नंतर सुभाष घईंचा हिरो.

जॅकी दादानं आपल्या सिने कारकीर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिले. त्यांनी जवळपास सर्वच दिग्दर्शकांसोबत काम केलं. पण सुभाष घईंनी जग्गू दादांच्या सिनेकारकीर्दीला तार चांद लावले. जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर ही जोडी म्हणजे सिनेमा हिट होण्याचा फॉर्म्युला होता. परिंदा सिनेमात सीन परफेक्ट व्हावा यासाठी जग्गू दादांनी अनिल कपूरला 17 वेळा कानाखाली मारल्याचा किस्सा सर्वश्रूत आहे.

80 चा उत्तरार्ध आणि 90चं दशक. हा असा काळ होता जेव्हा गावागावात लोकांच्या घरात टीव्ही येऊ लागला होता. तेव्हा शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस रात्री सिनेमा लागायचा. जग्गू दादा आमच्या पिढीला भेटला तो याच ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्क्रीनवर. तेरी मेहेरबानिया,  कर्मा,  दुध का कर्ज,  त्रिदेव, परिंदा, खलनायक, राम लखन असे एक से एक सिनेमे बघायचो. राम लखनमधला खाकी वर्दीतला तो रुबाबदार पणा पाहून वाटायचं मोठं झाल्यावर पोलीस बनायचे आणि अशाच मिशा ठेवायच्या. जॅकी श्रॉफ हा सर्वसामान्यांचा हीरो होता. तो कायम आपला वाटत आला. आपलं स्टारडम त्यानं कधीच इतर कलाकारांवर गाजवलं नाही. हीरो सिनेमातल्या बासरीच्या त्या पीसला आणि तेरी मेहेरबानिया सिनेमातल्या कुत्र्यालाही ते आपल्या यशाचं क्रेडिट देतात.

गरीबी,  भूक आणि जगण्याच्या संघर्षानं जग्गू दादांना इतकं संवेदनशील बनवलंय की ते गोरगरिबांच्या मदतीला कायम पुढे असतात. नानावटी हॉस्पिटलमध्ये जग्गू दादांचं अकाउंट आहे. ज्या माध्यमातून गोरगरीबांवर उपचार केले जातात. आजही ते रस्त्यावरून फिरतात, लोकांना भेटतात. सेल्फी देतात. 'भिडू.. एक झाड लगानेका' असा प्रेमळ आग्रह करतात. शेकडो लोकांच्या दुवा जग्गू दादांच्या पाठीशी आहेत. माणसाचं मोठेपण यातच असतं, जो आपलं मूळ विसरत नाही. एका फोनवर ते मदतीला धावून जातात. करोडोंच्या बंगल्यात राहूनही वेळ मिळेल तेव्हा आपल्या तीन बत्तीच्या चाळीत जातात. तिथल्या अड्ड्यावर जुन्या मित्रांमध्ये बसतात. गप्पांचे फड रंगवतात. दोन चार सिनेमात काम करून स्टारडम डोक्यात जाणार्या इंडस्ट्रीत जग्गू दादांसारखा सुपरस्टार आहे हे पुढच्या पिढ्यांना सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. आपल्या भिडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *