Breaking News

1/breakingnews/recent

११ फेब्रुवारी-भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना आज

No comments

 


NEWS24सह्याद्री 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येईल. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवलेली रोहित ब्रिगेड तिसरा सामनाही खिशात घालून वेस्ट इंडिजचा सूपडा साफ करण्याच्या तयारीत आहेत. तसेच पाहुणा संघ वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना जिंकून क्लिन स्वॅपपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात असेल. 

ही मालिका सुरू होण्यापूर्वी सलामीवीर शिखर धवनसह चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, आता धवनच्या पुनरागमनानंतर विजयी संघाचं संयोजन बदललं जाऊ शकतं. त्याच्या अनुपस्थितीत इशान किशनने पहिल्या सामन्यात तर ऋषभ पंतने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात केली होती.

दुसऱ्या सामन्यात 44 धावांनी मिळवलेल्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं धवन शेवटचा सामना खेळणार असल्याचं सांगितलं होतं. तो म्हणाला होता, 'शिखर पुढचा सामना खेळेल. गोष्ट नेहमीच परिणामाबद्दलची नसते. त्यानं मैदानावर वेळ घालवायला हवा." याचा अर्थ उपकर्णधार केएल राहुल पुन्हा मधल्या फळीत मैदानावर उतरेल. कर्णाधार रोहित गेल्या सामन्यात फारशी चांगली खेळी करु शकला नाही, पण तो आणि धवन चांगल्या स्थितीत असल्यास कोणत्याही गोलंदाजाच्या आक्रमणाचा पर्दाफाश करू शकतात. ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव मधल्या फळीत उतरतील. सूर्यकुमारने गेल्या सामन्यात 64 धावा करून तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपलं स्थान पक्कं केलं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *