Breaking News

1/breakingnews/recent

पुण्यात असणारा ऐतिहासिक बाबा भिडे पूल पाडणार

No comments
NEWS24सह्याद्री 

पुण्यातील बाबा भिडे पूल पाडला जाणार असल्याची असल्याची माहिती देण्यात. महापालिकेच्या वतीने  मूळा मुठा नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे.या अंतर्गत डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाडून नवीन उंचीचा पूल बांधण्यात येणार आहे.यासोबतच नदीपात्रातील रस्ता बंद करून मुळा-मुठा नदीचा अहमदाबादच्या साबरमती नदीच्या धर्तीवर विकास करण्याचीही योजना आहे. या संपूर्ण प्रकल्पाला 4 हजार 727 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचंही सांगण्यात आलंय .

पुणे महापालिकेतर्फे पावणे पाच हजार कोटी रुपये खर्च करून मुळा मुठा नदीचा काठ सुशोभित केला जाणार आहे. या प्रकल्पाचे महापालिकेतर्फे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान नदीपात्रातील रस्ते बंद झाले तर नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. मात्र या कामाच्या पहिल्या दोन्ही टप्प्यात नदीपात्रातील रस्ते बंद होणार नाहीत. भिडे पूल किंवा नदी पात्रातील रस्ते याचं काम कमीत कमी दोम वर्षांनंतर सुरु होईल त्यामुळे नागरिकांनी आता काळजी करण्याचे कारण नाही असंही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *