Breaking News

1/breakingnews/recent

४फेब्रुवारी-शाहिद आफ्रिदीची लज्जास्पद गोलंदाजी

No comments


NEWS24सह्याद्री

पाकिस्तान सुपर लीग 2022 स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडच्या फलंदाजांनी चौकार-षटकाराचा पाऊस पाडला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इस्लामाबाद युनायटेडने 20 षटकात चार विकेट गमावून 229 धावांचा डोंगर उभा केला. इस्लामाबाद युनायटेड संघातील तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावली. दुसऱ्याबाजूला क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने खूपच सुमार दर्जाची गोलंदाजी केली. एकेकाळाचा स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदीला अक्षरक्ष: धुतलं. त्याच्या चार षटकात 67 धावा वसूल केल्या. 

शाहिद आफ्रिदीचा पीएसएल 2022 मधला हा पहिलाच सामना होता. त्याला कोविडची लागण झाली होती. आफ्रिदीचं पुनरागमन खूपच निराशाजनक होतं. आफ्रिदीने त्याच्या कोट्यातील चार षटकात प्रति षटक 16.80 च्या सरासरीने धावा दिल्या. त्याला एकूण आठ षटकार लगावले. 

या कामगिरीमुळे शाहिद आफ्रिदी पीएसएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारा पहिला गोलंदाज बनला आहे. आफ्रिदीच्या आधी मागच्या सीजनमध्ये जफर गोहारने 4 षटकात 65 धावा दिल्या होत्या. 2019 मध्ये शाहिद आफ्रिदीने चार षटकात 62 धावा दिल्या होत्या. 

इस्लामाबाद युनायटेडकडून पॉल स्टर्लिंगने 28 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने तीन षटकार आणि सात चौकार लगावले. कॉलिन मुनरोने 39 चेंडूत 72 धावा केल्या. आजम खानने 32 चेंडूत 65 धावा केल्या. त्याने 6 षटकार आणि दोन चौकार लगावले. क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून एहसान अलीने 27 चेंडूत 50 धावा केल्या. एहसानने आठ चौकार आणि एक षटकार लगावला.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *