Breaking News

1/breakingnews/recent

१ नोव्हेंबर - शहराची खबरबात

No comments

  News24सह्याद्री: आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते मार्केटयार्ड चौकात नगर शहर फटाका स्टॉलचे उद्घाटन..पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...




                                              TOP HEADLINES


सहकार पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल


नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकसाठी स्व.दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व १८ उमेदवारांनी आज सकाळी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती केली. यावेळी माळीवाडा ते जिल्हा सहकारी बँकेमधील निवडणूक कार्यालयापर्यंत ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणुकीने जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी प्रेरित  होऊन  भाजपात स्वच्छ कारभार करत आहे. त्याच धर्तीवर अर्बन बँकेच्या निवडणुकीत उतरलो आहे. नगर अर्बन बँक हि जिल्ह्यातील प्रमुख मोठी बँक आहे. अर्बन बँकेची मलीन झालेली प्रतिमा पुन्हा उजळविण्यासाठी आणि  बँकेला गतवैभवप्राप्त  करुन देण्यासाठी मी सहकार पॅनलमधून निवडणूक लढवत आहे. सर्वाना बरोबर घेत काम करणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केलय.यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उद्दोजक मोहन मानधना, श्रीमती सरोज गांधी, मर्चंट बँकेचे संचालक अनिल पोखरणा, माजी जी.प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, सहकार महर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन किरण शिंगी, शिवसेनेचे संजय शेंडगे, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन महोन मानधना, नेवासा पं.स.चे सभापती भगवानराव गंगावणे, नेवासा शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हसे आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक आणि  विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *