पुणे बसस्थानकावरून अडीच लाखांचे दागिने चोरी
अहमदनगर - नगर शहरातील पुणे बसस्थानक येथून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 70 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली अभिजीत दहिगावकर (वय 35, रा. वाघोली, जि. पुणे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. गुरूवारी दुपारी उशिरा दहिगावकर या पुणे येथे जाण्यासाठी शहरातील सक्कर चौकातील पुणे बसस्थानक येथे आल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्याच्याकडील सोन्याचा नेकलेस, राणीहार पेंडल आणि गंठण असा दोन लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस निरीक्षक गवळी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
No comments
Post a Comment