सह्याद्री मॉर्निंग ९ जुलै
News24 सह्याद्री - मंत्री बदलून काय होणार?पंतप्रधान बदला ! पटोलेंचा हल्ला..!पहा सह्याद्री मॉर्निंग मध्ये...
मंत्री बदलून काय होणार ?पंतप्रधान बदला ! पटोलेंचा हल्ला
मोदी मंत्रिमंडळाच्या जम्बो विस्तारावर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही, तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणला आहे.तसेच मनसुख मांडवीय यांच्याकडे आरोग्य खाते सोपवले आहे. त्यावर 'याचा अर्थ आता लसींची कमतरता भासणार नाही?' असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या ट्विटसह राहुल यांनी 'चेंज' असा हॅशटॅगही दिला आहे.
No comments
Post a Comment