16 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला धक्का-बुक्की......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. देहू व आळंदीच्या प्रस्थान सोहळ्यात १०० वारकऱ्यांना परवानगी
आता पंढरपूरच्या विठुरायाच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० आणि उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली विभागाने जाहीर केली आहे. त्यानुसार, मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरीत पोहोचल्यावर पंढरपूरकडे १.५ कि.मी. पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
No comments
Post a Comment