जिल्ह्याची खबरबात - आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप
News24सह्याद्री - आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप
खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यासाठी जास्तीत जास्त बियाणे मिळावे यासाठी प्रयत्न करावे अश्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला केल्या होत्या. त्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सोयाबीन, बाजरी, मका, तूर आदी बियाणांचे वाटप कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकतेच पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने आणि उपसभापती अर्जुनराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. यावेळी उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, कृषि सहाय्यक आणि शेतकरी गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments
Post a Comment