Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - मनसे नेते म्हणाले;निलेश लंके, ही लढाई आपण सुरु केलीय आत्ता शेवट आम्ही करू

No comments

 News24सह्याद्री -




आदर्शवत कोविड  सेंटरमुळे राज्यात  कौतुकाचा विषय ठरलेल्या पारनेरचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांला १ कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस  दिलीये .अविनाश पवार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहे. आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च पाच हजार असे एकूण एक कोटी पाच हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतलाय मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत निलेश लंके यांना  इशारा दिला आहे. अब्रूनुकसानीची नोटीस आहे की खंडणीसाठीच पत्र असा सवाल उपस्थितकरत आपल्या या बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर  देऊ असं अखिल  चित्र यांनी म्हंटल आहे. तसेच निलेश लंके हि लढाई आपण सुरू केली , पण, ही लढाई आम्ही संपणार हे निश्चित असा इशारा देखील देण्यात आला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *