२३ मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - विशाल फाटे खुन प्रकरणात तीन आरोपींना १२ तासात जेरबंद....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. हॉटेल मृगदयनी सील
सध्या लॉकडाऊनमुळे हॉटेल आणि दुकाने बंद असुनही बजाज नगरमधील गजबजलेल्या चौकातील हॉेल मृगनयनी सुरु आहे. याच हॉटेलमध्ये ओल्या पार्टीसाठी आलेल्या विशाल फाटे यास मारहाण करुन भररस्त्यावर त्याचा खुन करण्यात आला आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेºयात मयत विशाल सोबत आरोपीची झालेली झटापटही कैद झाली आहे. लॉकडाऊन काळात नियमबाह्यपणे हॉटेल सुरु ठेवल्याचे हे हॉटेल सील करणार असल्याचे उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील व सहायक आयुक्त विवेक सराफ यांनी बोलतांना सांगितलय.
२. तुमसर- मोहाडी तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी
भंडारा जिल्हयात, खरीप हंगामातील , धान उत्पादक शेतकर्यांना बोनस देण्याची घोषणा होऊनही, राज्य शासनाने अद्यापही बोनसची रक्कम अदा केली नाही. तसेच जिल्हयाच्या तूमसर- मोहाडी तालुक्यात, उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यासाठी तालुक्यातील धान खरेदी केंद्र तीन दिवसात सुरू करावे, दुर्लक्ष केल्यास.
३. विशाल फाटे खुन प्रकरणात तीन आरोपी १२ तासात जेरबंद
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या बजाज नगरामध्ये शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास हॉटेलमध्ये ओल्या पार्टीत झालेल्या वादातुन तसेच चुलत भावाच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी गुंड विकास उर्फ मड्या फाटे याचा दगडाने ठेचुन खुन करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या ८ पैकी ३ आरोपींना शनिवारी सांयकाळी ५च्या सुमारास पाटोदा शिवारात जेरबंद करण्यात आलय. .मयत विशाल उर्फ मड्या किशोर फाटे हा आपल्या तीन साथीदारांना सोबत घेऊन शुक्रवारी रात्री ९ वाजता हॉटेल मृगनयनीत ओल्या पार्टीसाठी गेला होता. याचवेळी डोक्यात भला मोठा दगड टाकुनत्याची हत्या करण्यात आलीय.
४. जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई
भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या, शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लगतच्या परिसरातील एका हॉटेलच्या मागच्या बाजूला, गोट्या हरडे यांच्या घराजवळ,एका वाहनामध्ये वाहनांमध्ये गौवंश जातीची जनावरे कृरतेने कोंबून, अवैधरित्या वाहतूक करणार असल्याची माहिती, शुक्रवारी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.बी. ताजणे यांना मिळाली, यावेळी सहकारी कर्मचारी आणि पाच होमगार्ड यांच्यासह प[ओलीस घटना स्थळी सायंकाळच्या सुमारास पोहचले असता, हा प्रकार आढळून आल्याने, त्यांनी धडक कारवाई केली.
५. कल्याण मध्ये डंपरच्या धडकेत १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना आपल्याकडे टोलवलेला जमिनीवर पडलेला चेंडू उचलत असलेल्या 12 वर्षीय मुलाला मागे येत असलेल्या डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खाली पडलेल्या अमितच्या अंगावरून डम्परचे चाक गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील कचोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात घडली . याप्रकरणी टीळकनगर पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतले.
६. दोन कारवाईत दुचाकींसह ३ अट्टल चोरट्यांना अटक
भंडारा जिल्ह्यात दोन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत, दुचाकीसह तीन अट्टल चोरट्यांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून मुददेमालासह अटक केली आहे. क्रिष्णा लिल्हारे याच्याजवळ एक चोरीची एक्टीवा दुचाकी असल्याचे समजल्याने, कृष्णाला ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्याने सातोना, तुमसर, रामटेक , कन्हान आदी ठिकानाहून, पॅशन, टि.व्ही.एस. स्टार सिटी आणि दोन एक्टीवा अशा दुचाकीची चोरी करुन, विकल्याचे समोर आल्याने, त्याला अटक करुन चारही दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर दुसऱ्या कारवाईत पथकाने राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकमध्ये चोरी करणार्या, दोन आरोपींना सायबर सेलच्या मदतीने अटक केली.
७. भारतीयांचा परदेशप्रवास अवघड
करोना लशींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेला फटका बसला असून अनेक राज्यांमध्ये लसीकरण ठप्प झाले आहे. लसीकरणातील ही दिरंगाई आणि संथगती अशीच राहिली तर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध ३१ मेनंतरही उठण्याची शक्यता दृष्टिक्षेपात नाही. त्याचा परिणाम आर्थिक, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या प्रवाशांना युरोपीय देशांमध्ये प्रवेश देण्याबाबत युरोपीय महासंघामध्ये सकारात्मक चर्चा केली.
८. युवराजने बोलून दाखवली मनातील खंत
एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये युवराज सिंग नावाचं वादळ जोरदार घोंघावलं. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्याने वन-डे क्रिकेट आणि टी ट्वेन्टी क्रिकेट यामध्ये धमाकेदार खेळी साकारल्या. परंतु युवराज सिंगला टेस्ट क्रिकेटमध्ये म्हणाव्या तशा संधी भेटल्या नाहीत किंबहुना तो फार कसोटी क्रिकेट खेळला नाही. युवराज सिंगला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याच्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संधी मिळाल्या, याची खंत आजही युवराजला आहे.
९. सरकारचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश
कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषयीची संपूर्ण माहिती मिळत आहे. मात्र यातही अनेकदा खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावरील कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्या पोस्ट काढून टाकण्याचे आदेश या आधीही सरकारने सोशल मीडिया कंपन्याना दिले होते.
१०. सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र
म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा पुरवठा केला जाईल याची काळजी घ्यावी आणि या विकाराने बाधित असलेल्या रुग्णांवर विनामूल्य उपचार करावेत, अशी मागणी शनिवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. काळी बुरशी हा आजार आयुष्मान भारत आणि अन्य आरोग्य विमा योजनेअंतर्गत नाही.
No comments
Post a Comment