Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यपालांच्या भेटीला

No comments

 News24सह्याद्री -





सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. 


गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच राज्यपालांना भेटलो.. निकालामध्ये म्हटलंय आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू. आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे समाजाला न्याय मिळाला पाहिजे.. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ आज राष्ट्रपतींना पत्र दिलं आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *