Breaking News

1/breakingnews/recent

एक चिट डे मिळाला किंवा करायचाच असेल तर काय खायला आवडेल? कोहली म्हणतो

No comments



 मुंबई -

आजकाल कोरोनाच्या काळात पण प्रत्येकजण फिटनेस आणि डाएटच्या बाबतीत खूप जागृक झाला आहे. त्यात खेळ आणि क्रिकेट म्हटले की फिटनेस तर हवाच. त्याचा परिणाम आपल्या खेळावरही होत असतोच. फिटनेस म्हणटले की डोळ्यासमोर लगेच विराट कोहलीचे नाव समोर येते. विराट कायम आपल्या डाएटपासून ते जीमपर्यंत सगळ्या गोष्टी नियमितपणे करत असतो. विराट कोहली किती फिटनेसच्या बाबतीत आपली काळजी घेतो हे संपूर्ण जगाला माहिती आहे. अगदी खाण्या-पिण्याच्या गोष्टींपासून ते जीमपर्यंत विराटचा ठरलेले वेळापत्रकही असते. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य त्याचं डाएट आहे. तो ते नियमितपणे पाळतो. विराट आणि अनुष्काचे अनेक फिटनेसचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर येत असतात. 

एका मुलाखतीमध्ये विराट कोहलीनं त्याच्या फिटनेसचा खेळावर कसा परिणाम होती आणि तो स्वत:ला कसं फिट ठेवतो हे सांगितले आहे. स्वत:ला फीट ठेवण्यासाठी विराट सकाळी सकस नाश्ता करतो. दुपारी चिकन आणि रात्री शक्यतो सी फूड खाण्याकडे त्याचा कल असतो. एखाद दिवस वेगळे खाण्याची काहीतरी इच्छा होते. मात्र विराट कोहली त्याकडे कटाक्षानं दुर्लक्ष करतो. तरीही जर चिट डे मिळाला किंवा करायचाच असेल तर त्याला दिल्लीतील छोले बटुरे गरम गरम खायला आवडतील असंही त्याने सांगितलं आहे. दरम्यान विराट कोहलीनं खेळावर फीटनेसचा कसा परिणाम होतो हे सांगताना उत्तम उदाहरण देखील दिलं आहे. कोहलीच्या म्हणण्यानुसार एखादा कॅच पकडायला साधारणपणे 3 सेकंद किंवा 4 सेकंद जात असतील तर तुम्ही योग्य डाएट आणि ट्रेनिंग घेतलं तर 2 सेंकदात कॅच पकडू शकता. फील्डिंग दरम्यान 1 सेंकदाचा धावण्यातला गॅप कव्हर करून कॅच पकडण्यात पडलेला हा फरक हा आपल्या ट्रेनिंगमुळे असतो.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *