Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - लसीकरणाची प्रक्रिया ऑफलाईन चालू करण्याची मागणी ॲड. अनुराधा येवले

No comments

News24सह्याद्री - लसीकरणाची प्रक्रिया ऑफलाईन चालू करण्याची मागणी ॲड. अनुराधा येवले..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. लसीकरणाची प्रक्रिया ऑफलाईन चालू करण्याची मागणी ॲड. अनुराधा येवले
नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय लोकांचे जीव धोक्यात आले आहे या सर्व गोष्टींना जबाबदार मनपा आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ॲड.अनुराधा येवले यांनी केला आहे. मनपाच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरू आहे लसीकरण केंद्रावर नागरिकांची हेळसांड केली जाते ऑनलाइन नोंदणी असेल तरच लसीकरण दिले जाईल असे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते परंतु अशिक्षित नागरिकांनी ऑनलाइन लसीकरण नोंदणी कशी करायची त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे.

२. शहरातील काही खाजगी हॉस्पिटल चालकांकडून होणारी लूटमार थांबवा
अन्यथा कारवाई -मनपा आरोग्य समितीचे नगरसेवक डॉ.सागर बोरुडे कोरोनासंसर्ग विषाणूच्या काळात प्रत्येक नागरिक भयभीत झाला असून या कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. रुग्णांचे नातेवाईक उपचार मिळण्यासाठी खाजगी हॉस्पिटल कडे मनधरणी करत असतात मात्र काही हॉस्पिटलचे संचालक गैरफायदा उचलून रुग्णांच्या नातेवाइकांकडून शासनाने दिलेल्या बिलासंदर्भातील आदेशाची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच बिलाची आकारणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून करावी अशी मागणी मनपा आरोग्य समितीच्यावतीने खाजगी हॉस्पिटलांना नेमून दिलेल्या शासनाच्या ऑडिटरकडे केली आहे. 

३. कोव्हक्सीन साठी केंद्रावर गर्दी आणि वादावाद
 गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली कोव्हक्सीन लस अखेर नगरला उपलब्ध झाली आहे. मात्र महापालिकेचे ढिसाळ नियोजन नगरसेवकांच्या अतिउत्साहामुळे आणि कर्मचाऱ्यांची वागणूक यामुळे सर्वच केंद्रावर मंगळवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. केडगाव येथे तर गोंधळामुळे सकाळी सव्वा अकरा पर्यंत लसीकरण सुरू झालं नव्हतं. पहाटे पाच पासून लसीकरण केंद्रावर आलेल्या आणि प्रचंड हाल झालेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये यामुळे संताप व्यक्त होत होता. 

४  प्रभाग क्रमांक १२ मध्ये लसीकरण सुरु करण्यात यावे
राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम सुरु झाली  आहे.  नगर मध्ये मनपा हद्दी मध्ये लसीकरणाचे केंद्र कमी असल्याने लोकांचा मोठा गोंधळ उडत आहे . तसेच  आमच्या प्रभाग क्रमांक १२ ची लोकसंख्या २५ ते ३० हजार पाहता या भागातील नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेले मराठा सांस्कृतिक भवन येथे प्रशस्त पार्किग व सुसज्ज इमारत आहे . याच ठिकाणी हे  लसीकरण केंद्र सुरु करावे. 

५  मुक्या जनावरांसाठी अडीच टन चारा उपलब्ध
सध्या कोरोना महामारी आणि टाळेबंदी चा सर्वसामान्यांच्या जीवनावर दुष्परिणाम दिसून येत असून, मुके जनावरे देखील चाऱ्याअभावी व्याकूळ आहेत. कोरोनाच्या पहिला लाटेपासून अविरतपणे सर्वसामान्य गरजू घटकांना दोन वेळचं जेवण पुरविणाऱ्या घर-घर लंगर सेवेने भुकेने व्याकूळ झालेल्या मुक्या जनावरांसाठी अडीच टन चारा उपलब्ध करून आधार दिलाय. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *