जिल्ह्याची खबरबात - राहात्यातून महिलेसह दोन मुले बेपत्ता
News24सह्याद्री - राहात्यातून महिलेसह दोन मुले बेपत्ता....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बदलण्याच्या हालचाली !
कोल्हापूरमध्ये बसून नगर जिल्ह्याचे पालकतत्व स्वीकारलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातील कामगिरीबद्दल पक्षाच्या नेतृत्वापासून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यामध्ये नाराजीचा सूर आहे. मुश्रीफ यांच्याविरोधातील तक्रारी थेट राष्ट्रवाीदचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचल्या असून यामुळे मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धोक्यात आले आहे.
2. कान्हूरपठार पतसंस्थेचे एमडी दिलीप ठुबे यांचे निधन
राज्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्या कान्हूरपठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांचे नुकतेच पुणे येथे उपचार चालू असताना निधन झाले. कोरोनानंतर त्यांना म्युकरमायकोसीस या आजाराने ग्रासले. त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल क्लीनकमध्ये उपचार चालू होते. उपचारांना ते प्रतिसाद देत होते. मात्र, सकाळी त्यांची प्रकृती ढासाळली आणि त्यातच दुपारी त्यांची प्राणज्योत मालावली.
3. शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी - पिचड
अकोले निळवंडे धरणांची पाणी पातळी कमी झाल्यामुळे राजूर सह अनेक गावांच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत. तसेच उपसासिंचन योजना बंद पडल्यामुळे शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. निळवंडे धरणांची पाणी पातळी 610 मीटर तलांक ठेवावी तसेच पाण्याअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली आहे .
4. वाळूची वाहने पेटविल्याप्रकरणी गुन्हे दाखल
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रातील नायगाव परिसरातून चोरटी वाळुची वाहतूक करत असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी काही जणांनी ट्रक जाळल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5. दोन महिन्यांपासून मार्केट बंदमुळे कांदा उत्पादकांची अडचण
करोना स्थितीमुळे बाजार समितीचे लिलाव दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असल्याने कांदा साठवणुकीची सोय नसलेल्या शेतकर्यांची मोठी अडचण झाली असून वेळेच्या अगोदर पावसाची शक्यता असल्याने अनेक शेतकरी चिंतेत असल्याचे दिसते.
6. राहात्यातून महिलेसह दोन मुले बेपत्ता
एका 32 वर्षीय महिलेसह तिची दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार या महिलेच्या पतीने राहाता पोलीस ठाण्यात दिली आहे. राहाता येथील खंडोबा चौकातील आनंद उत्तमराव बारसे यांनी राहाता पोलिसांना दिलेल्या खबरीवरून त्यांची पत्नी सारिका आनंद बारसे हिच्यासह आलोक आनंद बारसे कार्तिक आनंद बारसे हे तिघे 7 मे पासून बेपत्ता आहेत
7. वादळी पावसाने उडविली दैना
कोपरगाव शहरासह परिसरात सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अक्षरशः दैना उडविली असून शहरातील व परिसरातील विविध भागात अनेक नागरिकांचे घराचे पत्रे उडाले काही ठिकाणी झाडे पडली तर काही नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही मात्र चानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
8. सलून व्यावसायिकाकडून सोनाचाराचा खून
बीड जिल्ह्यातील सोनाराचा भातकुडगाव येथील सलून व्यावसायिकाकडून खून जास्त सोन खरेदी करण्याच्या बहाण्याने 25 वर्षीय विशाल सुभाष कुलथे यांची हत्या पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेवगावातील शेतात पुरला तर मुख्य आरोपी पसार झाला असून त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
9. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
शिर्डी नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे गेल्या तीन-चार महिन्यांपासून 215 कर्मचाऱ्यांचे बीव्हीजी कंपनने पगार न दिले नाही एकाच पगार दिला असून उर्वरित पगार नगरपंचायत फंडातून देणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डोईफोडे यांनी दिली.
10. शिक्षक बँकेतील घड्याळ घोटाळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश
जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या मागील दिड वर्षापासून गाजत असलेल्या घड्याळ खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी याकरिता प्रवीण ठुबे, विकास डावखरे, गणेश वाघ व संतोष खामकर यांनी जिल्हा उपनिबधकांकडे सातत्याने मागणी केली होती. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षक बॅंकेतील घड्याळ घोटाळ्याची कलम८३ अंतर्गत चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले असल्याची माहिती प्रविण ठुबे, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद यांनी दिली.
No comments
Post a Comment