Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - केडगावला शिवसेनेचा पाठपुराव्याने लसीकरण केंद्र सुरू

No comments

   News24सह्याद्री - नगर बाजार समितीमधील निर्बंध कायम..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. गावठी कट्टा विक्री करणारा आरोपी जेरबंद    
गावठी कट्टा विक्री करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला असून नगर शहरातील गजराज नगर येथे इकबाल शेख उर्फ सोनू सिकंदर शेख  हा गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊनं एका गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस अशा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हा कट्टा सोहेल सय्यद अब्दुलगाणी हा विकत घेणार होता तसेच इकबाल शॆख याने हा कट्टा शेवगाव येथील दीपक कपोले याच्या कडून घेतला.

2. युवतीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया साठी शिवसेनेची मदत  
माळीवाडा येथील रहिवासी ऋतिका वर्पे हिला शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या प्रचंड खर्चासाठीच्या मदतीला शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम  नगरसेवक  कावरे व माजी नगरसेवक आसाराम कावरे धावून आले आणि पाहता पाहता पुरेशी धनराशी जमा झाली  व तब्ब्ल दोन लाख आठ हजारांचा धनादेश वर्पे कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी कदम म्हणाले सध्या कोरोनामुळे सर्वत्र लोकडाऊन आहे.

3. बाजारपेठेच्या दृष्टीने तपोवन रस्ता महत्त्वाचा म्हणून ओळखला जाईल ; जगताप
तपोवन रस्त्याच्या चालू असलेल्या अंतिम कामाची पाहणी संग्राम जगताप यांनी केली . यावेळी बोलताना ते म्हणालेकी शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असताना दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे त्यासाठी राज्य सरकारकडून औरंगाबाद महामार्ग ते मनमाड महामार्गांना जोडणारा तपोवन रस्त्यासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला आहे या रस्त्यांच्या कामांमध्ये विविध अडचणी आल्या होत्या आज मात्र या रस्त्याचे काम मार्गी लागत आहे.

4. नालेगावात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करावे ; नगरसेवक कवडे  
लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी नालेगाव येथील शिव पवन मंगल कार्यालयात तातडीने लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी माजी सभागृहनेते तथा नगरसेवक गणेश कवडे यांनी केली आहे कवडे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन दिले आहे शहर व उपनगरांमध्ये सध्या महापालिकेच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण केले जात आहे प्रत्येक केंद्रावरls घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून कोरणा संक्रमण वाढण्याचा धोका वाढला आहे.

5. वंचितांची ईद  गोड तर अक्षय तृतीया निमित्त आमरसाचे वाटप
लॉकडाऊन च्या पहिल्या टप्प्यापासून शहरात सुरू असलेल्या घर घर लंगर  सेवेच्या वतीने यावर्षी रमजान ईद निमित्तगरजूना फुड पॅकेट्स शेवई  पाठवून वंचितांची ईद  गोड केली तर सकाळी अक्षय तृतीया निमित्त आमरसाचे  वाटप करण्यात आले रमजान ईद व अक्षय तृतीया निमित्त शहरातील  पोलिस उपाधीक्षक विशाल ढुमे व  प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झेंडीगेट येथील हॉटेल अशोका मध्ये फुड पॅडचे  पॅकिंग करण्यात आले यावेळी घर घर  लंगर सेवेचे हरजितसिंह  वाधवा , प्रितपालसिंग धप्पड , मनोज मदान  आदी उपस्थित होते.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *