Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - आय सी यु मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती-श्रीनिवास बोज्जा

No comments

News24सह्याद्री - आय सी यु मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती-श्रीनिवास बोज्जा..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

१. आय सी यु मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती-श्रीनिवास बोज्जा
सध्याच्या परिस्थितीत काही हॉस्पिटलमध्ये सेवाभावी काम दिसून येते ते काही हॉस्पिटल मध्ये फक्त व्यवसायीकरण असल्याचे दिसून येत आहे कोबी पेशंट ऍडमिट केल्यानंतर हॉस्पिटलकडून कोणतीही कल्पना दिली जात नाही फक्त उपचार चालू आहे किंवा सिरीयस आहे असे सांगितले जाते याचा उपाय म्हणून जर आयसीयूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्याचे प्रक्षेपण हॉस्पिटलच्या आवारामध्ये मोठ्या स्क्रीनवर दाखवले तर पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटची सत्य परिस्थिती कळू शकते.

२. सिटीकेअर हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना मारहाण -
अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या सिटी केअर हॉस्पिटल मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे आयसीयू मध्ये 72 वर्षाच्या कोरणा रुग्णावर उपचार सुरु होते मात्र तो रुग्ण सतत ऑक्सिजन काढून टाकत होता त्यामुळे त्याची प्रकृती खालावली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला ही बातमी रुग्णाच्या नातेवाईकाला कळाल्यावर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला आणि आणि मारहाण केली.

३. 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा
शिस्तबध्द व आदर्श आर्थिक कारभारासाठी नावाजल्या जाणार्या अहमदनगर मर्चंटस् को ऑप.बँकेने मागील आर्थिक वर्षातही यशाची घोडदौड कायम राखली आहे. करोना महामारीच्या काळात अर्थकारणाला ब्रेक लागलेला असतानाही बँकेने उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत 31 मार्च 2021 अखेरपर्यंत 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ठेवींमध्येही मागील आर्थिक वर्षात 117 कोटी 73 लाखांनी वाढ झाली असून 31 मार्च 2021 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 1371 कोटीवर पोहचल्या आहेत. 

४. खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्याची मागणी - सभापती घिगे
सध्या कोरुना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्व बाजार समितीमधील शेतमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत.. यामुळे नगर बाजार समितीच्या मुख्य आवारातील व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत त्याचबरोबर वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतीमालाचे देखील नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

५. राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आंदोलनाचा इशारा
मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पदोन्नती मधील तीस टक्के आरक्षण रद्द करणारा शासनाच  निर्णय रद्द करण्याची मागणी कास्ट्राईब महासंघाने केली असून तसे झाले नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे पदोन्नती मधील तीस टक्के आरक्षण रद्द करणारा निर्णय सात मे रोजी शासनाने जाहीर केला होता हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *