कोरोना प्रादुर्भावमुळे पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
मुंबई -
राज्यातील कोरोनोचा संसर्ग अत्यंत वेगाने वाढत आहे त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता आताही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments
Post a Comment