Breaking News

1/breakingnews/recent

१ मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणाचा गोंधळ...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


१. महाराष्ट्रात रुग्णसंख्येत घट
महाराष्ट्रात एकूण ५६ हजार ६४७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर ६६९ रुग्ण दगावले. शनिवारच्या तुलनेत रविवारी हा आकडा घटल्याचं दिसून आलंय . शनिवारी राज्यात ६३ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.विकेंड असल्याने नेहमीपेक्षा कमी चाचण्या करण्यात आल्या.
२. अमरावती जिल्ह्य़ातील १०६ गावांमध्ये प्रवेशबंदी
अमरावती  जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या गावांना सील केले असून जिल्ह्य़ातील अशी तब्बल १०६ गावे सर्वाधिक करोना प्रभावित गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलीयेत.

३. वैद्यकीयच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची कोरोना रुग्णासाठी सेवा घेण्याचा विचार
वर्धा जिल्हय़ासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची करोना रुग्णासाठी सेवा घेण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका पालकमंत्री सुनील केदार यांनी मांडली.....महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर आयोजित आढावा बैठकीत करोना रुग्णाच्या वाढत्या संख्येबाबत चर्चा झाली..

४. नंदुरबार जिल्ह्याचा आरोग्य स्वयंपूर्णत्वाचा आदर्श
कुपोषणामुळे राज्यात प्रदीर्घ काळ चर्चेत राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्याने करोनाच्या संकटात मात्र वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये विलक्षण बदल घडवून आणले .... इतर जिल्हे वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि प्राणवायू तुटवड्यामुळे अडचणीत असताना नंदुरबारने एप्रिलच्या प्रारंभी दिवसाला १२०० पर्यंत गेलेली नव्या रुग्णांची संख्या विविध प्रयोगांमुळे आता प्रतिदिन २५० आणि ३०० पर्यंत खाली आणली आहे.

५. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची हायकोर्टात धाव
मंत्र्यांचे फोन टँपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दोन वेळा समन्स बजावण्यात आला होता मात्र रश्मी शुक्ला यांनी चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. आता याबाबत रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद कोर्टात धाव घेतली आहे. तसेच चौकशीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

६. नितीन गडकरी यांची अमरावतीला भरघोस मदत
 करोनाची भयावह लाट थोपवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती जिल्ह्य़ासाठी भरघोस मदत केली आहे. एकूण ३० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले असून येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात पाच कोटी रुपये खर्चून २०० क्युबिकच्या प्राणवायू संयंत्राची उभारणी के ली जाणार आहे. 

७. पोलीस कवायत मैदानावर ३०० खाटांचे कोविड केंद्र
नगर जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयावर पडणारा भार लक्षात घेऊन कर्जत—जामखेडमधील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार...यांच्या पुढाकारातुन नगर  शहरातील पोलिस कवायत मैदानावर ३०० खाटांचे  कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलय . 

८. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता
येत्या ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या आहेत.

९. जवळपास पाचशेहून अधिक नागरिकांचे  लसीकरण  
पुणे जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा शनिवारचा पहिला दिवस गोंधळ आणि गर्दीचा  ठरल्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी त्या तुलनेत लसीकरणाची प्रक्रिया काहीशी सुरळीत झालीये. गर्दीमुळे पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने लसीकरण होऊ शकले नव्हते. 

१०. चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणाचा गोंधळ
चंद्रपूर  जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र चंद्रपूर शहरापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नागभीड येथील केंद्रासह जवळच्या बल्लारपूर, राजुरा व ब्रम्हपुरी येथील लसीकरण केंद्रात अनेकांची नोंदणी झाल्याने बहुसंख्य लोकांचा गोंधळ उडालाय . त्याचा परिणाम म्हणून  ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर देखील अनेकांनी लस घेतली नाहीये. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *