Breaking News

1/breakingnews/recent

खतांच्या वाढत्या किमतीबद्दल शरद पवारांचे रसायन मंत्री सदानंद गौडा पत्र

No comments


मुंबई -

राज्यात कोरोनाचे थैमान चालूच आहे त्याच बरोबर आता शरद पवार यांनी पत्र लिहिले आहे. राज्यातल्या खतांच्या वाढत्या किमतीबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

केंद्र सरकारने खतांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाने शेतकरी आधीच होरपळून निघालेला असताना खतांचे दर वाढवणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे, असेही पवार म्हणाले. पवार यांनी या पत्राविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.

या पत्रात त्यांनी गौडा यांना देशातली परिस्थिती आणि त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकलेली संकटे यांच्याविषयी माहिती दिली आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे जनता संकटात सापडली आहे. लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले आहे. अशावेळी त्यांना मदत करायची सोडून खतांच्या किमतीत वाढ करुन सरकार त्यांच्या संकटात भर घालत आहे असंही पवार या पत्रात म्हणाले.

खतांच्या किमती वाढवण्याचा हा निर्णय धक्कादायक असून त्याचा पुनर्विचार करुन तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने करावा असंही या पत्रात लिहिले आहे. दोन दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी या दरवाढीचा निषेध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी राज्यभरात आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *