Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - नेवासा येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभा करणार - शंकरराव गडाख

No comments

 News24सह्याद्री - नेवासा येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभा करणार - शंकरराव गडाख....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES


१. आमदार आशुतोष काळे यांचे आवाहन
खरीप हंगामपूर्व व खरीप हंगामातील सर्व मोहिमांचे तसेच पीक कापणी प्रयोगांचे अद्यावत रेकॉर्ड तयार करून ते संगणकीय पद्धतीने संग्रहित करावे जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत होईल.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खते बी-बियाणे यासंदर्भात शेतकऱ्याला अडचण होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करावे.  

२. शिर्डी येथे महिला आंदोलकांवर पोलिसांची दडपशाही
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी मध्ये साईबाबा रुग्णालय येथे गेल्या अडीच  वर्षापासून अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या परिचारिकांनी वेतनवाढीसाठी आंदोलन केले समान काम समान वेतन अशी मागणी करणाऱ्या या महिला आंदोलकांना पोलिसांनी दडपशाही करत ताब्यात घेतले गेल्या वर्षभरापासून हे सर्वजण कोबी एडवर्ड मध्ये काम करत आहेत परंतु त्यांना कोणतेही वेतन वाढ किंवा आरोग्य सुविधा देण्यात आली नाही अशा परिस्थितीत आम्ही जगायचे कसे असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाला आहे.

३. आमदार आशुतोष काळे यांची बैठक
आमदार  आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेतली. आमदार  आशुतोष  काळे यांनी पंचायत समिती अंतर्गत प्रस्तावित असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला तसेच कोपरगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेली विकासकामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण करा.

४. शेतकरी वर्ग हवालदिल
अहमदनगर - कुकडीच्या पाण्याचे आवर्तन अद्याप मिळाले नसल्याने कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून यास आमदार रोहित पवार, आणि  कालवा सल्लागार समिती, प्रशासन यास जबाबदार असून पाणी सोडण्याबाबत आता न्यायालयाने स्थगिती दिल्याने उभी पिके जळताना पहायची वेळ आली असल्याची टीका आणि खंत माजीमंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

५. अकोले संशयित हालचालींमुळे स्वस्त धान्य वाहतूक करणारे ५ ट्रक पोलिसांनी घेतले ताब्यात
अकोले येथून राजूर मार्गे भंडारदऱ्या कडे स्वस्त धान्य घेऊन जाणाऱ्या चार ट्रक पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्या आहेत. ट्रक चालकांकडे असणारी धान्य वाहतुकी बाबतची कागदपत्रे संशयास्पद असल्यामुळे . त पोलिसांनी या ट्रक पोलिस ठाण्यात आणून उभ्या केल्या असून या तर्क बाबत चौकशी करण्यात येणार आहे
 ट्रक चालकांच्या संशयास्पद हालचाली व कागदपत्रावर गोडाऊन किपरच्या सह्या नाहीत, तसेच या ट्रकचे क्रमांक एम एच 17 ऐवजी मुंबई पासिंग आहेत. 

६. २२ उपकेंद्रात लस उपलब्ध करून दिली जावी - विशाल नाईकवाडे यांना अर्ज
जामखेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जेष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात यावे अशी मागणी जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जामखेड तालुक्यात ३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि  २२ उप आरोग्य केंद्र आहेत या पैकी फक्त ३ आरोग्य केंद्रातच लसीकरण करण्यात येत आहे. जर प्रशासनाने या २२ उपकेंद्रात लस उपलब्ध करून दिली तर जेष्ठ नागरीकांची हेळसांड होणार नाही. 

७. पाथर्डी मध्ये जनता कर्फ्यूचे उल्लंघन
पालिकेने गुरुवार पासुन शहरात पाळलेल्या जनता कर्फ्यूचा फज्जा उडाल्याचे चित्र आज शहरात दिसून आले. नागरिक मार्केट बंद असताना लहान-मोठी वाहने घेऊन गावात फिरताना दिसतायेत .  पालिकेने तहसीलदार यांचे सूचनांनुसार कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी ६ मे पासून १६ मे पर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली.  यामुळे मुख्य बाजारपेठेसह सर्वच भागात जनता कर्फ्यूमुळे शांतता होणे अपेक्षित होते.

८. कर्जत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे मोठे यश काही तासातच मोठ्या चोरीचा पर्दाफाश
कर्जत -कर्जत येथील शाम दसपुते  यांच्या घरात १० मे  रोजी चोरी झाली होती या चोरी  मध्ये दसपुते यांच्या घरातून सोने चांदी सह रोख  रकमेची चोरी झाली होती या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता या चोरीचा तपास कर्जत पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा  करत असताना काही तासातच या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसानं यश आले.

९. 1998 ते 2000 या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बॅचकडून दीड लाख रुपये आर्थिक मदत
कोरोणाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे आणि आरोग्य सुविधांची  कमतरता भासत आहे. कोरोना रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शेवगाव तालुक्यात 1998 ते 2000 या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बॅचने दीड लाख रुपये आर्थिक मदत तहसीलदार अर्चना पागिरे, डॉ.रामेश्वर काटे, डॉ सलमा हिराणी, डॉ.दिपक परदेशी, डॉ. विजय लांडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. या आर्थिक मदतीचा वापर वैद्यकीय साहित्य तसेच ऑक्सीजन सिलेंडर यासाठी होणार आहे. 

१०. नेवासा येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट - शंकरराव गडाख
नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन प्लांट उभा राहणार असून त्यादृष्टीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सूचना दिलेल्या असल्याने लवकरच नेवासे तालुक्यातील ऑक्सिजनबाबत मोठा प्रश्न सुटणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *