Breaking News

1/breakingnews/recent

शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह,शिल्पा शेट्टीने दिली माहिती

No commentsमुंबई -

देशभरात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढते आहे. सामान्य जनतेपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळे कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. मागील १० दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांची कोरोनो चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे त्याच्यां त्यांच्या रुममध्ये आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. आमच्या घरातील दोन कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

पुढे शिल्पा म्हणाली, “देवाच्या कृपेने सर्व जण बरे होत आहे. माझी कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. नियमांनुसार सर्व खबरदारी घेतली जात आहे. बीएमसी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभारी आहोत. आमच्यासाठी प्रार्थना करण्याचे देखील आभार. तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असो वा नसो, कृपया मास्क घाला, स्वच्छता ठेवा आणि सुरक्षित रहा..तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह रहा, अशा आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.

शिल्पा शेट्टीच्या कुटुंबाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्या आधी बॉलिवूडमध्ये आमिर खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल, आलिया भट्ट, रणबीर कपूर सारख्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. तर गेल्या वर्षी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब सोबत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *