Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शहरातील कडक निर्बंधांबाबत दुपारपर्यंत निर्णय घेणार

No comments

News24सह्याद्री - शहरातील कडक निर्बंधांबाबत दुपारपर्यंत निर्णय घेणार..पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES


1. गर्दी न करता ईदचा सण साध्यापध्दतीने घरीच साजरा करा
रमजान हा सण संयम व अल्लाहची भक्ती शिकवतो. कोरोनाच्या काळात मुस्लिम समाजाने देखील संयमाने हा सण गर्दी न करता साध्या पध्दतीने घरीच साजरा करावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान सण शांततेत व गर्दी न करता साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर झेंडीगेट येथे शहरातील मुस्लिम समाजातील व्यक्ती, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शहराचे विभागीय पोलिस उपअधिक्षक ढुमे यांनी बैठक घेतली. 

2. शहरातील कडक निर्बंधांबाबत दुपारपर्यंत निर्णय घेणार
महापालिकेने लागू केलेल्या कडक  निर्बंधांचा अपेक्षेप्रमाणे फायदा झाला नाही असे सांगून याबाबत जिल्हाधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिली कोरोना  साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त शंकर गोरे यांनी गेल्या काही  दिवसांत शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत त्याची मुदत संपली आहे.

3. मनपाकडून एम्स रुग्णालय विकत घेण्याच्या हालचाली
कोरोनाच्या  तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय असावे अशी सूचना करत आरोग्य समितीने येथील एम्स रुग्णालय विकत घेण्याचा पर्याय पदाधिकारी व प्रशासनासमोर ठेवला आहे. 

4. अल्प दरात rt-pcr चाचणीची व्यवस्था
कोरोनाचा  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद टेस्टिंग आणि ड्रेसिंग अतिशय महत्त्वाचे आहेत टेस्टिंग  जितक्या लवकर होईल तितके उपचार लवकर सुरू करता येतात नगर शहरात अशाच जलद टेस्टिंगसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्था योगदान देत आहेत हे कौतुकास्पद आहे नगर शहराला कोरणा मुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

5. व्यापाऱ्याला पंधरा हजारांचा दंड
शहरात कडक निर्बंध लागू असताना डाळ मंडई येथे चोरून किराणा मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला पंधरा हजारांचा दंड करण्यात आला आहे महापालिकेच्या भरारी पथकाने ही कारवाई केली महापालिकेने शहरात क** निर्बंध लागू केले आहेत वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत मात्र शटर बंद करून किराणा भाजीपाला आदींची विक्री सुरू आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *