Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - जम्बो कोविड सेंटरच्या मागणीसाठी आंदोलन

No comments

 News24सह्याद्री - जम्बो कोविड सेंटरच्या मागणीसाठी आंदोलन..पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES

1. लसीकरणाच्या वाढत्या तक्रारी
लसीकरणासंदर्भात रोज वाढत्या तक्रारी असून 45 वर्षांपुढील नागरिकांना लस मिळणे जिकिरीचे झाले आहे..... तसेच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस घेण्यासाठीही सतत चकरा माराव्या लागत आहेत साठा पुरेसा मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते मात्र लस मिळत नसल्याने भर उन्हात नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत ...45 वर्षाच्या पुढील वयोगटातील नागरिकांनी पहिली लस घेतली आहे.

2. जिल्हा रुग्णालयास अत्याधुनिक व्हेंटीलेटर मशीनची मदत : वर्मा
 करोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत प्रत्तेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना प्राणवायू व व्हेंटीलेटर मशीनची गरज आहे. ही गरज ओळखून सुमित वर्मा युवा मंच व सराफ सुवर्णकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांच्या वतीने जिल्हा रुग्णालयास चार अत्याधुनिक व्हेंटीलेटर मशीन देण्यात आले.

3. जम्बो कोविड सेंटर च्या मागणीसाठी आंदोलन  
शहर  काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्व खाली महानगर-पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनासमोर जम्बो कोविड सेंटर च्या मागणीसाठी ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन सुरु आहे.... महानगर पालिका व काँग्रेस यांच्यात झालेले दोन दिवसापूर्वीच्या बैठकीत जम्बो कोविड  सेंटर चा विषय मार्गी लावण्यासाठी तातडीने बजेट तयार करत कृती केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते.

4. अखिल भारतीय छावाने पाठविला राज्यसरकारला साडी चोळी बांगडी आहेर
गेल्या पस्तीस वर्षाचा प्रदीर्घ लढा.... लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेले मूक मोर्चे यानंतर तत्कालीन युती सरकारने मराठा समाजास आरक्षण जाहीर केले ...मात्र, आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या  विरोधात महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण टिकविता आले नाही....त्याच बरोबर केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अधिकार काढून घेतल्यामुळे देखील सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण टिकले नाही.
  
5. अहमदनगर मचर्ंटस्‌ बँकेच्या चेअरमनपदी अनिल पोखरणा यांची निवड

अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदाची  निवडणूक पार पडली त्या मध्ये  मर्चंट्स बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत एक मताने हि निवड करण्यात आली असून मर्चंट्स बँकेच्या चेअरमन पदी आणील पोखरना यांची निवड करण्यात आली .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *