विराट, रोहित - रहाणेसह मुंबईत बायो-बबल मध्ये एण्ट्री
मुंबई -
कोरोनाने बायो बबल मध्ये शिरकाव केल्यामूळ IPL गेल्या अनेक दिवसामुळं रद्द करण्यात आलं होय परंतु आता परत विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया पुढच्या महिन्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. 18-22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाईल. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम 2 जूनला इंग्लंडला चार्टर विमानाने रवाना होईल, पण त्याआधी खेळाडूंना मुंबईत बायो-बबलमध्ये राहावं लागणार आहे. यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणे यांनी मुंबईतल्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष टीमसोबतच महिला टीमही इंग्लंडला रवाना होणार आहे. दोन्ही टीमला इंग्लंडला पोहोचण्याआधी कठोर क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे.
मिताली राज, आर.अश्विन, मोहम्मद सिराज, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, आर.श्रीधर, भरत अरुण, झुलन गोस्वामी, इंद्राणी रॉय यांच्यासह अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आधीच मुंबईत पोहोचला आहे आणि त्यांच्या क्वारंटाईन कालावधीला सुरुवात झाली आहे. सगळ्या खेळाडूंना बायो-बबलमध्ये एण्ट्री करण्याआधी आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येणे गरजेचे होते. तसंच खेळाडूंना हे रिपोर्ट घेऊन येणे बंधनकारक होतं. बीसीसीआयने यासाठी एका एजन्सीला काम दिलं आहे. ही एजन्सी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कोरोना टेस्टवर लक्ष ठेवेल. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय टीम तीन दिवस तिकडेही क्वारंटाईन होईल, यानंतर त्यांच्या सरावाला सुरुवात होईल, पण क्वारंटाईन कालावधीमध्येही त्यांना ट्रेनिंगला परवानगी देण्यात यावी, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे.

No comments
Post a Comment