Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - केदार शिंदे यांची पोस्ट क्षणात झाली व्हायरल

No comments

News24सह्याद्री केदार शिंदे यांची पोस्ट क्षणात झाली व्हायरल..पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES

१. केदार शिंदे यांची पोस्ट क्षणात झाली व्हायरल
कोरोनाची भीषण स्थिती बघता अनेक राज्यांत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत आणि अशाही स्थितीत आयपीएल सारखा इव्हेंट अगदी जल्लोषात सुरु आहे. म्हणायला प्रेक्षक नाहीत, पण म्हणून आयपीएलचा थाट कमी नाही. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी यानिमित्ताने एक जळजळीत पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. 

२. मोदीना 'टोमणा' अन् सोनियांना 'चरणस्पर्श' - रामगोपाल वर्मां
देशातील  पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावलाय.  याऊलट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी  यांचे चरणस्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.रामगोपाल यांनी एकापाठोपाठ एक अनेक उपरोधिक ट्विट केलेत. 

३. प्रत्येक रूपया महत्त्वाचा -फरहान अख्तर
कोरोनाच्या या भीषण स्थितीत समाजातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकारही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सोनू सूद,, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सलमान खान असे अनेक कलाकार सध्या कोरोना काळात लोकांसाठी झटत आहेत. 

४. दिलीप कुमार रूग्णालयात भरती !

98 वर्षांचे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती कारणास्तव मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून रूटीन चेकअपसाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

५. हर्षवर्धन ने ऑक्सिजनसाठी विकायला काढली बाईक    
देशात कोरोनाची भीषण स्थिती आहे. एकीकडे देशात रोज लाखो नवे कोरोना रूग्ण सापडत आहेत़. दुसरीकडे ऑक्सिजन व बेड्सचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. लोक हतबल होत  आहेत.  ही भीषण स्थिती पाहून कोणत्याही संवेदनशील मनांना पाझर फुटेल. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *