Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - ख्रिश्‍चन समाजातील दफन विधीचा काळा बाजार थांबवण्याची मागणी

No comments

News24सह्याद्री - ख्रिश्‍चन समाजातील दफन विधीचा काळा बाजार थांबवण्याची मागणी..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर चा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याची मागणी
पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर चा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करावे व त्यांना देखील पूर्ण काळात 50 लाखांचा विमा संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबां जहागिरदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे

2. बूथ हॉस्पिटलच्या रुग्णसेवेने भारावलो : कमांडर कर्नल वानलाल फेला

बूथ हॉस्पिटलचे कर्मचारी रुग्णांची मनोभावे सेवा करतात त्यामुळे इथून अनेक रुग्ण बरे होऊन गेले हे पाहून आम्ही भारावून गेलो.साल्वेशन आर्मीचे टेरिटोरियल कमांडर कर्नल वानलाल फेला व चीफ सेक्रेटरी लेफ्टनंट कर्नल जॉन विल्यम यांनी साल्वेशन आर्मी संचलित बूथ हॉस्पिटलला भेट देऊन कोविडच्या कामाची पाहणी केली.त्यावेळी ते बोलत होते  मागील एक वर्षापासून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे सर्व सहकार्य पाठबळ साल्वेशन आर्मी या संस्थेने बूथ हॉस्पिटलला दिले. 

3. ख्रिश्‍चन समाजातील दफन विधीचा काळा बाजार थांबवण्याची मागणी
अनंत बहुउद्देशीय संस्थेकडून कोरोनाने मयत झालेल्या ख्रिश्‍चन समाजातील मृतदेहांच्या दफनविधीसाठी कोणत्याही सुविधा मिळत नाही व दफनविधी झाल्यावर नातेवाइकांकडून पैशाची मागणी करतात हा दफन . विधीचा काळाबाजार थांबवण्याची मागणी विश्‍व मानवाधिकार परिषदच्या वतीने करण्यात आली आहे.

4. ऑक्सिजन अभावी पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
ऑक्सिजन अभावी पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सावेडीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये  सकाळी घडली मृत्यू झालेले पोलिस कर्मचारी दौंड येथील प्रशिक्षण केंद्रातील आहेत हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मयत पोलिसांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत  आहे.पोलीस कर्मचाऱ्यास कोरोना संसर्ग झाल्याने 28 एप्रिल ला सावेडी मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.

5. आडते असोसिएशनच्या वतीने एक लाख 31 हजार यांची मदत 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आर्थिक दुर्बल घटक सर्वसामान्य कुटुंबातील कोरोना  रुग्णांना आधार देण्यासाठी कोठी मार्केट येथील अहमदनगर भाजीपाला फळफळावळ यांचे असोसिएशनच्या वतीने एक लाख 31 हजार रुपयांची मदत प्रेरणा प्रतिष्ठाण ला देण्यात आली आहे तर आमदार संग्राम जगताप यांच्याकडे अहमदनगर भाजीपाला फळफळावळ असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लांडे यांनी  मदतीचा या रकमेचा धनादेश सुपूर्द केलाय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *