Breaking News

1/breakingnews/recent

१ मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री औरंगाबाद मधील बहुतांश भागात आज लाईट गुल....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES

1. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी 

औरंगाबाद, वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या करोडी येथून जाणाऱ्या १२४कि.मी. लांबीचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग-५२ च्या कामाच्या प्रगतीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पाहणी केली.

2. औरंगाबाद मधील बहुतांश भागात आज लाईट गुल.
औरंगाबाद शहरात मागील दोन तीन दिवसांपासुन पावसाचे वातावरण तयार झाले आहेत, तसेच शहरातील ऊन्हाचा पारा देखील वाढलेला आहे व अश्यातच महावितरणणे पावसाळी कामाला सुरवात केली आहे.

3. घाणेगाव येथे स्वतःच्या विहिरीतच महिलेचा मृतदेह*
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या घाणेगाव गंगापूर येथील तलावा जवळील विहिरीत एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत देह आढळल्याची घटना शुक्रवार ३० एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

4. येसगाव येथील खून करणारे  आरोपी पाच पैकी चार आरोपी काही तासात केले जलबद 
औरंगाबाद वाळूज पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या येसगाव शिवारातील गायरानात राहणाऱ्या एका तरुणाची दोन्ही पाय तोडून व गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवार २९ एप्रिल रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. 

5. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कणकवली मिळत असल्याने १० दिवसांचा जनता कर्फ्यु
कणकवली तालुक्यात जनतेचा जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद, रस्ते, बाजारपेठेत निरव शांतता.कणकवली तालुक्यात १ ते १० मे या कालावधीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटना यांच्यातर्फे  करण्यात आले होते. 

6. अमरावतीत महापौर बंगल्यावर शिवसेनेचे आंदोलन
अँकर:-अमरावती शहरात कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असतांना देखील अमरावती शहरात महानगरपालिकाचे वतिने शहरात स्वच्छता केली जात नाही तसेच शहरात सॅनिटायझरची फवारणी सुद्धा केली जात नसल्याचा आरोप करत अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांच्या महापौर बंगल्यावर शिवसेनेचे वतीने सॅनिटायझरची फवारणी करत याचा निषेध केला.

7. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना उशिरा जाग आली :- धनंजय मुंडे
बीड :- जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं होतं. पण उशिरा का होईना त्यांना कोविड परिस्थितीवर जाग आली आहे. आता त्यांनी केंद्राकडे लशीसाठी विचारणा करावी, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे  यांना लगावला आहे.


8. वरठी येथे उभे राहणार पूर्व विदर्भातील सर्वात मोठे कोविड हॉस्पिटल 

सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान  घातले आहे. हा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी राज्यशासन आणि सर्व यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी जागा नाही. यादृष्टीने, वरठी येथे, सनफ्लेग कंपनी जवळ 1000 खाटांची व्यवस्था आणि सर्व सुविधा यांनी सुसज्ज असलेले, कोविड हॉस्पिटल युद्ध स्तरावर उभारण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार  नाना पटोले यांनी दिली.

9. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा

 'कोरोना' ची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा, असा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच कोरोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही

10. 'मी सेटलमेंट केली तर महाराष्ट्राचे डीजीपी माझ्या विरोधातील चौकशी मागे घेतील'

मुंबईचे माजी पोलिस कमिशनर परमबीर सिंह यांनी नुकतंच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी यावेळी महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांच्यावर आरोप करत म्हटलं आहे की, जर मी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेतली तर ते माझ्या विरोधात सुरु असलेली चौकशी ते सेटल करतील. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *