Breaking News

1/breakingnews/recent

भारतीय क्रिकेटपटूंना केवळ 'कोविशिल्ड' लस घ्यायचा सल्ला, कारण काय

No comments



मुंबई -

कोरोनाने आता क्रिकेट मध्ये सुद्धा शिरकाव केल्याचं दिसत आहे.  कोरोनाविरोधी लढ्यात लसीकरण ही ढाल बनलीय. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणावर भर दिला जात आहे. भारत सरकारने तर आता 18 ते 44 वयोगटाच्या दरम्यानच्या लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या योजनेत भारतीय क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. अशातच भारतीय क्रिकेटपटूंना केवळ ‘कोविशिल्ड’ लस घ्यायचा सल्ला  देण्यात आल्याची माहिती एका रिपोर्टनुसार पुढे आली आहे. कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू आपापल्या घरी आहे. काही दिवस ते आपल्या कुटुंबाबरोबर क्लालिटी टाईम घालवतील. नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीम जाणार आहे. त्याअगोदर भारतीय संघाच्या खेळाडूंनी केवळ कोविशिल्डचा डोस घ्यावा, असा सल्ला देण्यात आल्याची माहिती, एका रिपोर्टनुसार पुढे आलीय. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याअगोदर भारतीय खेळाडूंच्या लसीकरणाविषयी काय प्लॅन आहे?, असा प्रश्न बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना गांगुलीने संपूर्ण प्लॅन सांगितला. भारतीय खेळाडूंजवळ आता वेळ आहे. व्यक्तिगत पातळीवर ते स्वत: लस घेऊ शकतात. सगळे खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे लस घेणे त्यांच्यासाठी अधिक सोपे झाले आहे.  असे सौरव गांगुली म्हणाला.

खेळाडूंना फक्त कोविशिल्ड लसच घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविशिल्ड लस घेणं केवळ त्याच क्रिकेटपटूंसाठी आवश्यक आहे जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड मालिकेत भाग घेऊ शकतात. भारतीय खेळाडूंनी कोविशिल्डचा पहिला डोस भारतात घेतल्यास त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये घेता येईल. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाचं कोविशिल्ड हे प्रोडक्ट असल्याने इंग्लंडमध्ये असताना भारतीय खेळाडू कोविशिल्डचा दुसरा डोस घेऊ शकतात.

कोविड 19 च्या लसीकरण मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना विषाणूच्या कोणत्याही लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. जर एखाद्याने कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल तर त्यांना कोवॅक्सिनचाच दुसरा डोस घ्यावा लागेल. म्हणूनच भारतीय खेळाडूंना कोविशिल्ड लस घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. कारण भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुमारे चार महिने असल्याने संघातील खेळाडू कोविशिल्डचा दुसरा डोस सहज घेऊ शकतात.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *