Breaking News

1/breakingnews/recent

विराटची तुलना मनी हाइस्टमधील प्रोफेसरशी? विराट कोहलीच्या नवीन लुकची चर्चा

No comments




मुंबई -

सध्या कोरोनाच्या काळात लोकडाऊनमुळे सगळे आपआपल्या मध्ये व्यस्त आहेत त्या मधेच विराट कोहलीच्या नवीन लूकची चर्चा रंगत आहे. 'मनी हाइस्ट' या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरीजबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. मनी हाइस्टच्या पाचव्या सिझनची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या वेब सिरीजमधील मास्टरमाइंड 'द प्रोफेसर'ची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज आहे. तसेच त्याचा लूक हा चाहत्यांना विशेष पसंतीस पडतो. आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा लांब केस, मोठी दाढी आणि चष्मा लावलेला नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या लूकची बरीच चर्चा होत असून अनेकांनी विराटची तुलना मनी हाइस्टमधील प्रोफेसरशी केली आहे.

रिषभ श्रीवास्तव नामक एका व्यक्तीने विराटचा नवा लूक असलेला फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. १८ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ट्रॉफीहाइस्टमधील प्रोफेसरचा पहिला लूक, असे त्याने या फोटोखाली म्हटले. १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार असल्याने त्याने ही कॅप्शन दिली. परंतु,रिषभ श्रीवास्तवने शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा होऊ लागली. अनेक चाहत्यांना विराटचा हा नवा लूक खरा वाटला. परंतु, सोशल मीडियावर विराटच्या या लूकची चर्चा झाल्यानंतर रिषभ श्रीवास्तवला हा फोटो खरा नसून फोटोशॉप केला असल्याचे स्पष्ट करावे लागले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *