Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - कोविड रुग्णालय व बेडची माहिती आता एका क्लिकवर

No comments

   News24सह्याद्री - कोविड रुग्णालय व बेडची माहिती आता एका क्लिकवर....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES


1. शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी पारदर्शकच
अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त खरेदी करण्यात आलेली घड्याळ खरेदी ही पारदर्शक झालेली आहे असा स्पष्ट अहवाल याबाबतच्या चौकशी समितीने दिला आहे.घड्याळ वाटपातील तांत्रिक कारणांना घोटाळ्याचे नाव देऊन विरोधी मंडळी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत.शिक्षक बँकेचा कारभार सभासद हिताचा आणि  काटकसरीचा राहिला आहे. संचालक मंडळाने सभासदांसाठी अनेक हिताचे निर्णय घेऊन सभासदांना न्याय दिलेला आहे. 

२. माणिकदौंडी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात रुग्णवाहिकेचे लोकार्पण 
आज पाथर्डी तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य ललिता शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा  लोकार्पण सोहळा  माणिकदौंडी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात पार पडलाय. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण समितीची सभापती अर्जुनराव शिरसाट, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे, पंचायत समिती सदस्य सुनील ओहोळ यांच्या हस्ते पार पडला.

३. समर्थ ग्रुपच्या तरुणांनी केले दोन हजार अंडी व  मास्कचे  वाटप
सध्याच्या परिस्थितीत अनेक कोरोनाबाधीत रुग्ण मिळून येत आहे, कोरोनावर कोणतेही औषध नसल्यामुळे रोग प्रतिकारकी शक्ती निर्माण करणे आवश्यक आहे आणि डॉक्टर देखील रुग्णांना प्रोटीन युक्त आहार घेण्याचा सल्ला देत आहे.

४. कर्जतमध्ये पोलिसांची अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई
कर्जतच्या  शिवारात भीमा नदी पात्रात भरत बलभीम अमनर, दत्तत्रे विक्रम खताळ, अंकुश बाप्पू ठोंबरे हे तांत्रिक बोटीच्या च्या साह्याने चोरून वाळू उपसा असल्याची माहिती  पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांना मिळताच त्यांनी या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर  कारवाई केलीय. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट यांनी आपल्या संपूर्ण स्टाफ सह गणेश वाडी या ठिकाणी जाऊन खात्री केली. 

5. आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
कोरोनाच्या संकटात नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी वेळेत योग्य त्या उपाययोजना केल्यामुळे कोपरगाव तालुक्यात सकारात्मक परिणाम दिसून येत असून जिल्हा परिषदेच्या निधितून तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला निश्चितपणे बळकटी मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. 

6. सर्वांनी मिळून कोरोनाला हरवण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन  
कोरोनाची नगर जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा  सामना करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे, त्या दृष्टीने आधीच आरोग्य सुविधा निर्माण करुन कोरोनाच्या  प्रतिबंधासाठी आपण सज्ज होत आहोत असे प्रतिपादन अहमदनगर  जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल आहे.

7. पावसाळ्यापूर्वी नगर शहरातील ओढ्या-नाल्यांची साफसफाई सुरू
पावसाळ्यापूर्वी नगर शहरातील ओढ्या-नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी ओढ्या-नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी सुरू केली. यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

८. कोविड रुग्णालय व बेडची माहिती आता एका क्लिकवर   
कोविडच्या  संकटामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी स्वतंत्र अँप  उपलब्ध करून दिल असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली  आहे. तालुक्यात असलेली कोवीड  रुग्णालय ,कोविड  केअर सेंटर यांची माहिती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहज मिळत नाही, त्यामुळे नातेवाईकांचा वेळ रुग्णालय आणि बेड मिळवण्यासाठी जातो.

९. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भाळवणीत आढावा बैठक  
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्याचे उपाय योजनांची अंमलबजावणी सर्वत्र केली जात असून पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या वाटेने आपल्याला आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि त्या संदर्भातील कार्यवाही करण्यास भाग पाडलय, सध्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे, त्या दृष्टीने आधीच आरोग्य सुविधा निर्माण करुन कोरोना  प्रतिबंधासाठी आपण सज्ज होत आहोत. 

१०. 59 भुकटीची पाकीटे भरलेला टेम्पो पोलिसांनी पकडला
दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या संशयावरून 59 भुकटीची पाकीटे भरलेला टेम्पो श्रीरामपूर  शहर पोलिसांनी सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास येथील अशोक टॉकीज परिसरात  पकडला. घटनास्थळी दोन शेजार्‍यांमध्ये रात्रीच्यावेळी वाद झाल्याने एकाने वादाची माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *