Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - भातकुडगाव येथे शिरूर कासार येथील युवकाचा सापडला मृतदेह

No comments

 News24सह्याद्री - भातकुडगाव येथे शिरूर कासार येथील युवकाचा  सापडला मृतदेह....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES


1. बांधकामाचे लोखंड चोरणारी टोळी गजाआड
कोविडच्या भयावह संकटातही कोपरगाव शहरात चोरीचे सत्र चालू होते. कचरु  निकम आणि  नीरज  कासलीवाल यांच्या फिर्यादीवरून  शहरातील  साईसिटीया ठिकाणांहून तेराशे किलो वजनाचे बांधकामाचे लोखंड चोरल्याप्रकरणी पोलिसा स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. व या चोरीचा पोलिसांनी कसून तपास करत शनिवारी सात आरोपींना सुमारे ३ लाख ५० हजाराच्या मुद्देमालासह गजाआड केले आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. आर.पी. पुंड, पो.कॉ. एस.जे.अग्रवाल हे करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार उपनगरातील खडकी येथील गट्या उर्फ विशाल शिंदे यास ताब्यात घेउन विचारपूस केली.

2. भातकुडगाव येथे शिरूर कासार येथील युवकाचा  सापडला मृतदेह
शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असून याच दुकानात सोनाराचा खुन करण्यात आला असल्याचे समजते. अधिक माहिती घेवुन त्याचा साथीदार केतन लोमटे याला पोलीसाने ताब्यात घेतले.शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथील दत्तात्रय गायकवाड यांच्या शेतात मृत्यूदेह  खड्डा खोदून पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 

3. अहिल्यादेवी होळकर यांचा 296 जयंती कार्यक्रम रद्द
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी 31 मे ला त्यांच्या जन्मगावी श्री क्षेत्र चोंडी येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जायची परंतु कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर 31 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये  लॉकडाऊन असल्याने यावर्षी नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा 296 वि जयंती कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे.

4. कोरोनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज ; बाळासाहेब  थोरात
राज्यातील कोरोना रुग्ण वाढ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले निर्बंध असूनही राज्यातील बुलढाणा कोल्हापूर रत्नागिरी सांगली यवतमाळ अमरावती सिंधुदुर्ग सोलापूर अकोला सातारा वाशिम बीड गडचिरोली अहमदनगर उस्मानाबाद या पंधरा जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यू दर अधिक असून तो कसा कमी करता येईल याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
 
5. कारवाईच्या भीतीने नायगाव येथे वाळूची दोन वाहने पेटविली  
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून वाळूची तस्करसुरु असते .श्रीरामपूर सह वैजापूर राहुरी तालुक्यातील वाळूतस्कर श्रीरामपूर परिसरातील वाळू तस्कर हाताशी धरून नायगाव तसेच शहराला गोवर्धन या परिसरातून रात्री बेसुमार वाळूउपसा करतात. या ठिकाणी रात्री गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती संदीप मिटके व तहसीलदार प्रशांत पाटील यांना मिळाली तातडीने पोलिस व महसूल प्रशासन तसेच स्वतः डीवायएसपी व तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस फोर्स चे कर्मचारी नदीपात्रात वाळूच्या तीन गाड्या पकडल्या.

6. श्रीरामपुरात विनाकारण फिरणार्‍या इसमांची रॅपिड टेस्ट
कोरोना च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार एक जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे . लोकडाऊनच्या काळात रस्त्यांवरून विनाकारण फिरणाऱ्या इसमांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात पॉझिटिव रुग्णांचे थेट कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली या काळात पोलिसांनी चौकाचौकात कडक बंदोबस्त करून  विनाकारण फिरणाऱ्यांची  चांगलीच हजेरी घेतली जात होती. 

7. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चला गोरगरिबांची चूल पेटवुया अभियान सुरू  
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चला गोरगरिबांची चूल पेटवुया अभियान सुरू आहे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती राहाता तालुका यांच्या नेतृत्वाखाली नांदुखी  खुर्द चे प्रहार शाखाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य विजय वाणी यांच्या आर्थिक नियोजनातही राहाता तालुक्यातील नांदूर खुर्द व नांदुखी  बुद्रुक या गावातील मोलमजुरी करणाऱ्या महिला निराधार तसेच अत्यंत गरीब अशा तब्बल दोनशे कुटुंबाला भाजीपाला वितरण करण्यात आले.

8. तीन घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीस 24 तासात जेरबंद  
श्रीरामपूर पोलिसांनी घरफोडी करणारया आरोपीला जेरबंद केले असून २४ तासाच्या आत पोलिसांनी या आरोपीला जेरबंद केले आहे  इब्राहिम  शहा यांच्या घरातून मोबाइलसह काही रक्कम चोरीस गेली होती याची तक्रर शहा यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिल्या नंतर काही तासातच शहाबाज सलीम शहा या अट्टल घरफोडी करणारा आरोपी श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केला.

9. नेवासे येथे स्त्री जातीचे अर्भक बेवारस  
नेवासा तालुक्यातील कौठा शिवारातील  विहीरीजवळ असलेल्या उसाच्या शेतात नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत सापडले असून आरोग्य पथकाला घटनास्थळी जाईपर्यंत नवजात अर्भक गतप्राण झाले.आरोग्य विभागाने त्यांस मृत घोषीत केले. या घटनेने कौठा चांदा परिसरात मोठी खळबळ उडाली असून या अमानुष घटनेचा पोलिसांनी तपास लावावा अशी मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

10. पुण्याकडे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरो चा घाटात अपघात  
नाशिक-पुणे महामार्गावर punyakde आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरो ला संगमनेर तालुक्यातील माhuली घाटात अपघात झाला यात चालक जखमी झाला असून हा अपघात आज सकाळी साडेसात वाजता झाला आहे यात वाहनाचे व आंब्याचे नुकसान झाले आहे गोविंद साठे या wahnchalkala घाटाचा वळणाचा अंदाज न आल्याने त्याच्या पिकावरील ताबा सुटला व पिकप महामार्गावर उलटली घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *