कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI ची मोठी घोषणा, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देणार
मुंबई -
कोरोना दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. ऑक्सिजन मूळ मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून 10 लीटरचे 2000 कॉन्सेट्रेटर्स प्रदान केले जातील. हे कॉन्सेट्रेटर्स येत्या काही महिन्यांत संपूर्ण भारतात वितरित केले जातील. बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, यामुळे गरजूंना आवश्यक वैद्यकीय मदत मिळेल. तसेच साथीच्या आजारामुळे होणारा त्रासही कमी होईल. भारतातील कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे बरेच नुकसान झाले आहे. यामुळे वैद्यकीय पुरवठा व ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याबाबत म्हणाला की, कठीण काळात वैद्यकीय आणि आरोग्य सेवांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आरोग्य कर्मचारी पुढे आले आणि त्यांनी लढाई केली, लोकांना वाचवण्यासाठी सर्व काही केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ देखील आरोग्य आणि सुरक्षिततेस महत्त्व देत आहे. अशा मदतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्सची रुग्णालयांना आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही कॉन्सेट्रेटर्स वितरित करण्याचा निर्णय घेतला.

No comments
Post a Comment