Breaking News

1/breakingnews/recent

9 मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - अवकाशात भरकटलेलं चीननं रॉकेट आज कोणत्याही क्षणी पृथ्वीवर 'या' भागात धडकणार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINEAS


1. आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत, तसं बहुजनांचं पालकत्व स्वीकारा
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहे. 

2. महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना 
रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. 

3. अ'क्षय' लढा, क्षयरोग असतानाही 280 रुग्णांनी कोरोनाला हरवले! पालिकेच्या शिवडी टीबी रुग्णालयात उपचार
खोकला-श्वसनाच्या त्रासासह अनेक लक्षणे असणारा 'टीबी'सारखा आजार असूनही मुंबईत गेल्या वर्षभरात तब्बल 280 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. पालिकेच्या शिवडी टीबी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. पालिकेच्या माध्यमातून घेतलेली खबरदारी-उपचारांमुळे हे रुग्ण बरे झाले.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच वेगाने प्रसार झाला. 

4. कोरोना: टीका करणाऱ्यांना रोखण्याऐवजी कोरोनाला रोखायला हवं होतं; 'लॅन्सेट'मधून पंतप्रधान मोदींवर टीका
जगप्रसिद्ध वैद्यकीय संशोधन मासिक 'लॅन्सेट'ने आपल्या संपादकीयमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, ट्वीटरवर टीका करणाऱ्यांना रोखण्यापेक्षा कोव्हिडला रोखण्यावर त्यांनी भर द्यायला हवा होता.

5. अवकाशात भरकटलेलं चीननं रॉकेट आज कोणत्याही क्षणी पृथ्वीवर 'या' भागात धडकणार
अवकाशात भरकटलेलं आणि चीन च्या नियंत्रणाबाहेर असणारं रॉकेट लाँग मार्च 5 मोठ्या वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. आज कोणत्याही क्षणी हे रॉकेट पृथ्वीवर धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी चीनमधील अंतरिक्ष केंद्रावरून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं. 

6. हेमंत बिस्वा सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री?
आसाम च्या मुख्यमंत्री पदासाठी हेमंत बिस्वा सरमा यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी 11 वाजता भाजप च्या निर्वाचित सदस्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता एनडीएची बैठक होणार आहे. त्यावेळी हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

7. देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधित;
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत आहे. भारतात दिवसाला जवळपास 4 हजार रुग्णांचा मृत्यू होतोय. तसेच देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची देशात नोंद करण्यात आली आहे. 

8. सिंधुदुर्गात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषित केला आहे. या काळात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, बेकरी, भाजीपाला, दूध व्यावसायिकांनी होम डिलिव्हरी करायची मुभा देण्यात आली आहे. मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद राहतील. 

9. जेलमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत SC चिंतेत
तुरुंगात कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या संख्येने कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, सर्व राज्यांत स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी केलेल्या सूचनेनुसार कैद्यांच्या सुटकेबाबत निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील कोर्टाच्या आदेशावरून अंतरिम जामिनावर कैद्यांची सुटका झाली होती. 

10. लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतर, कच्च्या मालाचा पुरवठा आवश्यक
देशातील कोरोना लसीकरणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतर, महत्वाची उपकरणे आणि कच्च्या मालाचा पुरवठा करणे आवश्यक आहे असं मत भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि जॉईन्ट एमडी इला सुचित्रा यांनी व्यक्त केलं. त्या युरोपियन युनियन-भारत व्यापारी गोलमेज संमेलनात बोलत होत्या.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *