Breaking News

1/breakingnews/recent

6 मे Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - 'मॅरेथॉनपटु' लता करे यांच्या पतीला कोरोनाने हिरावलं........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES


1. भाजपतर्फे निदर्शने व तहसीलदारांना निवेदन
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या राज्यभर हिंसाचार सुरू आहे . हिंसाचार त्वरीत थांबवावा या आशयाचे निवेदन चोपडा भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करून नायब तहसिलदार राजेश पउळ यांना देण्यात आले त्याच  निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे.

2. जुन्या वैमन्यस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने खून
जुन्या वैमन्यस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने वार करुन, खून केल्याची  भंडारा जिल्हयाच्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथे घडली होती.मात्र घटनेचे गांभिर्य लक्षात घेता, भंडारा स्थानिक गुन्हे शाखा आणि वरठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून अवघ्या तासाभरात संयुक्त कारवाई करुन, खुन करणार्‍या ३ आरोपींना अटक केली.

3. खा चंद्रकांत खैरे यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन घेतला आढावा
औरंगाबाद वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत आरोग्य केंद्रातील सुविधाचा आढावा घेत नियोजित आॅक्सिजनप्रकल्पाचा देखील त्यांनी आढावा घेतलाय 

4. रांजणगावात शेजारी आपसात भांडणात दोघांचे डोके फुटले
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्याा रांजणगाव  येथे किरकोळ कारणावरुन शेजारी आपसात कडाक्याचे भांडण झाल्याची घटना  मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास रांजणगावात घडली. या मारहाणीत दोघांचे डोके फुटले असून परस्पर तक्रारीवरुन ६ जणाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5. कल्याण डोंबिवलीत लसीकरण केंद्र सुरु करावे - दीपेश म्हात्रे !
दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, बेडरीडन यांच्यासाठी कल्याण डोंबिवलीत लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरीक तासन तास रांगेत उभे असतात.सर्वसाधारण नागरीकांप्रमाणे हे नागरीक रांगेत उभे राहू शकत नाहीत. 

6. मराठा क्रांती मोर्चाचं जालन्यात अर्धनग्न आंदोलन
जाळण्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नको असे मत मांडत काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. या निर्णयाच्या विरोधात काळा दिवस पाळून मराठा क्रांती मोर्चा तर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासन आणि मागास आयोगाने दिलेल्या अहवालात मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे.

7. बारामतीच्या 'मॅरेथॉनपटु' लता करे यांच्या पतीचं कोरोनाने निधन
बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटु लता भगवान करे यांचे पती भगवान करे यांचे काल  कोरोनाने निधन झाले. २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावत लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता.त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

8. अदर पुनावाला यांना धमकावणाऱयांविरुद्ध एफआयआर दाखल करा!
कोविशिल्ड लस तयार करणाऱया पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना धमकावणाऱयांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणाची चौकशी करून पुनावाला यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 

9. कोरोनाविरुद्ध लढ्याची जबाबदारी गडकरींकडे द्या : सुब्रमण्यम स्वामी
कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असताना भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनीही कोरोनावरून केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

10. आधी आयपीएल मग वर्ल्ड कप
अनेक खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व ग्राऊंडमन यांना कोरोनाची लागण झाल्याने चार आठवडय़ांनंतर 'बीसीसीआय'ला 'आयपीएल' टी-20 क्रिकेट स्पर्धेचा गाशा गुंडाळावा लागला. याचबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपचे आयोजनही धोक्यात आले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *