Breaking News

1/breakingnews/recent

२5 मे Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - चोरट्यांनी कोव्हिडं वॅक्सिन समजून पोलिओचे डोस नेले चोरून !....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. सव्वा लाखाच्या बिलासाठी साडेपाच तास मृतदेह धरला दाबून
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या ममता हॉस्पिटल येथे बील भरण्याच्या कारणावरुन कोविड रुग्णांचा मृतदेह साडे पाच तास दाबून धरण्याची खळबळजनक घटना काल सोमवारघडली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर साडे पाच तासानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. सिडको वाळूजमहानगरातील एका ४९ वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना ३ मे रोजी  ममता मेमोरीयल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते.

2. डोंबिवलीत मनविसे कडून सफाई कर्मचाऱ्यांना हँडग्लोज चे वाटप !
कोरोनाच्या लाटेत सफाई कर्मचारी व घंटागाडी वरील कर्मचारी गेल्या वर्षभरापासून फ्रंट लाईन वर्कर म्हणून नागरिकांच्या सेवेत काम करत आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांच्यां वाढदिवसाचे औचित्य साधून काल डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या वतीने सफाई कर्मचारी व घंटा गाडीवरील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेतेसाठी हँड ग्लोज चे वाटप करण्यात आले.

3. पोलिस व गरजूंना मदत करीत तरुणाने केला वाढदिवस साजरा
कोरोना संसर्गाच्या काळात पोलिस प्रशासन उन्हा तान्हात उभे राहून आपले कर्तव्य बजावित आहेत. कोरोनाने अनेक पोलिसांचे जीव जात असले तरी न डगमगता पोलिस रस्त्यांवर पहारा देत आहेत. शिवाय गरजूंना देखील मदत करीत आहेत. अशा कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीतील अक्षय सकपाळ या तरुणाने पोलिसांना पाणी बॉट्ल्स व गरजूंना जेवण पाण्याची सोय करुन आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

4. चोरट्यांनी कोव्हिडं वॅक्सिन समजून पोलिओचे डोस नेले चोरून !
कल्याण मलंगगड परिसरातील मांगरुळ आरोग्य केंद्रामधील खिडकीचे गज तोडून रुगणालायत प्रवेश केला व कोव्हिडं लस समजून लहान मुलांना देण्यात येणारी पोलिओ लस चोरीला नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि टीव्ही सुद्धा चोरला आहे. 

5. अड्याळ गावातील विद्युत व सोलर पॅनलसह खांबाची दुरावस्था
भंडारा जिल्ह्यातील अडयाळ गाव येथील, मुख्य चौक तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या, विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाची जीर्णावस्था झाली असुन काही महीण्याआधी लावण्यात आलेले सोलर पॅनलची दुरावस्था झाली आहे. तर काही खांबांवरील सोलर पॅनल गायब झाले असुन, ते खांब किंवा त्यावरील सोलर प्लेट व बॅटरी वर्दळीचा मार्ग असल्याने नागरिक व वाहनधारक ये-जा करतांना, कोणत्याही क्षणी पडून अपघात होवून जिवितहाणी होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नुकताच भंडारा जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. 

6. तुमसर येथील खापा चौकात केला रस्तारोको आंदोलन
भंडारा जिल्ह्याच्या तूमसर-मोहाडी तालुक्यातील उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करावे,तसेच जिल्ह्यात खरिप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा होवूनही , राज्य शासनाने बोनसची रक्कम अदा केली नाही, ऑनलाईन सातबारा झालेल्या शेतकर्‍यांचे उन्हाळी धान खरेदी करणे बंधनकारक राहणार नाही, ही टाकलेली अट शिथिल करावी यासह अन्य, मागण्यांचे निवेदन माजी आमदार चरण वाघमारे यांनी तूमसर- मोहाडी येथील तहसीलदार यांचेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. मागण्यांकडे दूर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. 

7. लाँकडाऊनला कंटाळून औरंगाबादमध्ये रिक्षा चालकाची आत्महत्या.
औरंगाबादमध्ये ऐका रिक्षा चालकाने लाँकडाऊन ला कंटाळून आत्महत्या केलेली आहे यानंतर खासदार जलील यांनी कुटुंबाची भेट घेऊन माहिती घेतली व जलील यांनी घरी जाऊन सात्वन केले नंतर ते पत्रकारांशी बोलत होते..

8. रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यास १०५ रुग्णालयांचा नकार
एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी मानल्या गेलेल्या रेमडेसिविरचा वापर गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी झाला असून, काेरोना रूग्णांची कमी होत असलेली संख्या व दुसऱ्या टप्प्यातील काेरोना लाटेवर रेमडेसिविरची मात्रा कामी येत नसल्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे रेमडेसिविरचे महत्त्व कमी झाल्याचे मानले जात आहे.

9. राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांचे निधन
 राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष हाजी गफ्फार रशीद मलिक यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

10. पोलिसांना फळ विक्रेत्यांकडून मारहाण
निर्धारित वेळेनंतर सुरु असलेला बाजार हटविण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांना फळ विक्रेत्यांनी मारहाण केली. एकाने पोलिसाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याची घटना फत्तेपूर ता. जामनेर येथे सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. यात एकास अटक करण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *