Breaking News

1/breakingnews/recent

10 मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - अंत्यसंस्कारासाठी जमले १५० जण; २१ जणांचा मृत्यू...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES


 1. MP: हजार खाटांचं जंबो कोविड सेंटर
  करोनामुळे देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. रोजच करोना रुग्ण वाढीचा नकोसा विक्रम प्रस्थापित होत आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असलेल्या नेहरू स्टेडियममध्ये १ हजार खाटांचं कोविड सेंटर सुरु करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कोविड सेंटरमध्ये योगापासून टीव्हीवर रामायण आणि महाभारत दाखवण्याची सोय करण्यात आलीये.

२. अंत्यसंस्कारासाठी जमले १५० जण; २१ जणांचा मृत्यू
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावात करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नियमांचे पालन न करता अंत्यसंस्कार करणे गावकऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.  मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव खीरवा गावात आणण्यात आलं होतं. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी १५० लोक सहभागी झाले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.अंत्यसंस्कारावेळी करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावकऱ्यांनी मृत व्यक्तीचे पार्थिव प्लास्टिक बाहेर काढले होते. 

३. ८० डॉक्टर, कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह
दिल्लीतील सरोज रुग्णालयामधील डॉक्टरांसह ८० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे रुग्णांची संख्या पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाधित झाल्यानंतरही येथे रुग्णांवरील उपचार सुरु ठेवण्यात आलेत. या संसर्गाच्या लाटेमध्ये मागील २७ वर्षांपासून या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरचा करोना संसर्गामुळे मृत्यू झालाय.

४. आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ-हेमंत बिस्वा
आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यांच्यासोबत १३ कॅबिनेट मंत्र्यांनीदेखील  शपथ घेतली. आसाम भाजपा विधिमंडळ पक्षाचे  नेते म्हणून शर्मा यांची निवड झाली. त्यानंतर हेमंत बिस्वा शर्मा यांनी  राजभवन येथे राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. 

५. स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल
देशात काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे. देशात १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहे. 

६. म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे चंद्रपुरात १० रूग्ण मिळाले
चंद्रपूरमध्ये म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे १० रूग्ण चंद्रपुरात मिळाल्याचे डॉ.निवृत्ती राठोड यांनी सांगितलेय त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडालीये . या दहाही रूग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून औषधोपचार सुरू आहेत.कोरोना उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या स्टेरॉईडमुळे रूग्णांना अतिशय गंभीर साईड इफेक्टचा सामना करावा लागत आहे. 

७. आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस बाधित
राज्य पोलीस दलातील करोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे करोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेले अधिकारी, अंमलदार बाधित झाल्याने पोलीस दल चिंतेत आहे. राज्य पोलीस दलातील २० अधिकारी, १६० अंमलदार बाधित झाले. 

८. राजकारण करणारे गडकरींची सल्ला मानतील – रोहित पवार
देशात करोना जेवढ्या वेगाने पसरत आहे. तेवढ्याचं वेगाने राजकारण देखील होत आहे. करोना काळात देखील राजकारणाला उत आला आहे. करोना परीस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष  सतत एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, राजकारण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नितीन गडकरी यांनी खडे बोलं सुनावलेत. नागपूर कार्यकारिणी बैठकीत नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना साथीच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच यावेळी पक्षाने बरीच कार्यकर्ते गमावली आहेत.

९. पत्नीचा आणि मुलाचा खून करून स्वतः घेतला गळफास
करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन सदृश्य निर्बंधांच्या झळा आता सर्वसामान्य कामगारांना बसू लागल्या आहेत. बेरोजगारीमुळे ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन जीवनप्रवास संपवल्याची भयंकर घटना घडलीये.

१०. ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार!
एका खुनाच्या घटनेप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झालीये . दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरूद्ध लूक आऊट नोटीस बजावली आहे. छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात २३ वर्षीय कुस्तीपटू सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले. पोलिसांनी अलीकडेच त्याच्या घरावर छापा टाकला होता.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *