Breaking News

1/breakingnews/recent

10 मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरूच....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका कोण जिंकणार?
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप  आणि त्यानंतर कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर  जाणार आहे. विराटसेना 18-22 जूनदरम्यान न्यूझीलंड विरुद्ध विजेतेपदासाठी भिडणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही हायप्रोफाईल कसोटी मालिका होण्यापूर्वीच भारतीय संघाचा माजीज कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविडने  विजेत्या संघाचं नाव घोषिक तेलं आहे.

2. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास डार्क चॉकलेट खा...
कोरोना संसर्गाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे. कोरोना झालेल्यांनी काय काय खावे याची पूर्ण लिस्टच हर्षवर्धन यांनी जारी केली आहे.डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. 

3. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता, ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. ज्यानिमित्तानं 43 नव्या चेहऱ्यांची वर्णी मंत्रीपदी लागणार आहे. अनेक नवोदितांना या मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचा अंदाज अनेकांनीच वर्तवला आहे. 

4. साताऱ्यातील 13 कोरोनाबळी गेलेल्या हॉटस्पॉटमध्ये लग्नानंतर डीजे पार्टी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यांसह धार्मिक, राजकीय, सामाजिक स्वरुपाच्या जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पाटणमध्ये लग्नानंतर धिंगाणा घालण्यात आला. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांनी कारवाई केली.

5. दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री,
दिल्लीला गरजेपेक्षा अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. मात्र त्याचा अकार्यक्षमतेने वापर सुरू आहे. दिल्लीत ऑक्सिजनच्या जादा साठ्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते, असा खळबळजनक आरोप केंद्र सरकारने केला आहे. केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दिल्लीतील ६२ महत्त्वाची शासकीय रुग्णालये तसेच ११ ऑक्सिजन भरणा केंद्रांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळून आले

6. 18-44 वयोगटासाठी राज्यांनी लस खरेदी करणं योग्य
सर्वोच्च न्यायालयात आज  होणाऱ्या सुनावणीआधी केंद्र सरकारने आपल्या लसीकरण धोरणाचा बचाव केला आहे. केंद्र सरकार 100 टक्के खरेदी स्वत: का करत नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली होती. यावर केंद्राने उत्तर दिलं की, "आम्ही 50 टक्के लस खरेदी स्वत: करण्याचं धोरण विचारपूर्वक बनवलं आहे. 

7. कुठं लॉकडाऊन, तर कुठं कर्फ्यू; कोरोनामुळं 26 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात प्रशासनाची कठोर पावलं
कोरोना विषाणूचं वाढतं संकट पाहता, देशातील अनेक राज्यांमध्ये सक्तीचा लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य प्रशासनांकडून या धर्तीवरील निर्णय घेण्यात येत आहेत. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 4 लाख 3 हज़ार 738 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर 4,092 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. 

8. गावकऱ्यांचा निर्धार आणि प्रशासनाची मदत, लॉकडाऊन काळात तलावाची निर्मिती
'गाव करी ते राव काय करी' या म्हणीची प्रचिती वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या गावात पहायला मिळाली. या गावात एक नाही अनेक समस्या. गेल्या कित्येक दिवसांपासून या गावाच्या अनेक मागण्या मात्र तोडगा काही निघेना. शेवटी गावातील युवकासह एका सामाजिक कार्यकर्त्यामुळे आणि प्रशासनाच्या मदतीने लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करुन तलावाची निर्मिती केली. 

9. मागील 45 दिवसांत मुंबईत पहिल्यांदाच रुग्णसंख्या 2500 हून कमी
 कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही अधिक धोका असणारी मुंबई प्रत्येक संकटावर मात करत नव्यानं श्वास घेतना दिसू लागली आहे. तिची हीच उर्जा जणू रुग्णांनाही एक सकारात्मक उर्जाच देत आहे असं म्हणायला हरकत नाही. रविवारी मुंबईत एकूण 2403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 

10. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरूच
देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनसृदृश्य निर्बध घालण्यात आले आहे. यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाली असली आहे. असं असलं तरी किंमतीत कोणतीही घट झालेली नाही. मागील आठवड्यात 4 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली. शनिवार आणि रविवारी किंमती वाढ झाली नाही.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *