Breaking News

1/breakingnews/recent

गुणकारी पुदीना, आरोग्यासाठी 10 फायदे, वाचा

No commentsNews24सह्याद्री -

पुदीन्याची चटणी आपण सर्वांनाच आवडतं असेल. स्वाद देण्याव्यतिरिक्त पुदीन्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पुदीन्याची पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, मळमळ, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो.

पुदीन्याचे अनेक लाभ आहेत-

मळमळ किंवा उल्टीचा त्रास असल्यास पुदीना वापरणे खूप फायदेशीर मानले गेले आहे. यासाठी पुदीनाच्या पानात दोन थेंब मध मिसळून सेवन करावे. सर्दी, पडसे, खोकला आणि तापात आराम मिळावा यासाठी पुदीन्याचा रस, मिरपूड आणि काळे मीठ मिसळून ते उकळून चहा सारखे प्यावे. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत बनवण्यासाठी पुदीना पाने वाळवून पावडर तयार करावी. ही पावडर वापरल्याने समस्या सुटेल. पोटाची उष्णता कमी करण्यासाठी पुदीना वापरणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्त होण्यासही फायदा होतो. त्याचे कोणतेही

दुष्परिणामही नाहीत.

जे लोक दिवसभर बाहेर असतात त्यांना पायातील तलवे जळजळ करु लागतात. अशा परिस्थितीत त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेली पुदीन्यांची पाने वाटून पायाच्या तळावर लावावी.

पायांची उष्णता देखील कमी होईल.

पुदीना ताक, दही, कच्च्या आंब्याचा रसात मिसळून प्यायल्यास पोटातील जळजळीवर आराम होईल आणि गरम वारा आणि उष्माघातापासून संरक्षण मिळेल. पुदीन्याच्या पानांनी त्वचेचे अनेक प्रकारचे रोग दूर करता येतात. जखमेच्या उपचारांसाठी देखील ते चांगले आहे. जर तुम्हाला सतत हिचकीचा त्रास होत असेल तर पुदीनामध्ये साखर घाला आणि हळू हळू चावत राहा. काही वेळेत हचकीपासून मुक्त व्हाल. याशिवाय उन्हाळ्यात पुदीनाची पेस्ट चेहर्‍यावर लावल्यास त्वचेची उष्णता संपेल आणि ताजेपणा जाणवेल.

पुदीन्याच्या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *