Breaking News

1/breakingnews/recent

सकाळची प्रेस गांजा ओढून घेतली होती का - गोपीचंद पडळकर

No comments
मुंबई 

गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल ते म्हणाले की काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितले की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का,” असा बोचरा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्य सरकारला केला. येत्या 1 मेपासून राज्यभरात कोरोना  प्रतिंबधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारने यापूर्वी सांगितले होते. 

मात्र, काल (28 एप्रिल) पत्रकारांशी बोलताना 1 मे पासून पुरेशा लसींअभावी लसीकरणाची मोहीम राबवता येणार नाही असे राजेश टोपे यांनी सांगितले सांगितले होते. त्यानंतर हाच मुद्दा घेऊन पडळकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.  काल सकाळी राज्याच्या पालकमंत्र्यांनी घोषित केले की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितले की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहे. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? यांना उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचे आहे. यांना केंद्राकडे बोट दाखवायचे आहे. मुळात विचारसरणी एक नसताना,  कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहे असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *