Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - दहा हजारांची लाच घेताना हवालदार जेरबंद

No comments

   News24सह्याद्री - दहा हजारांची लाच घेताना हवालदार जेरबंद..पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES

1. दहा हजारांची लाच घेताना हवालदार जेरबंद. 
दारू व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना तोफखाना पोलीस ठाण्यातील हवालदार बार्शीकर काळे याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केलीय. नगर शहरातील पाइपलाइन रोडवरील एका दारू व्यावसायिकाकडे काळेने 15००० रुपयांचा हफ्ता  देण्याची मागणी केली होती.तडजोड करत दहा हजार रुपये देण्याचे ठरल. याबाबत मात्र या व्यावसायिकांने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 

२. नगरला ५० टन ऑक्सिजन पोहोचला
बेड आहेत तर ऑक्सिजन नाही आणि ऑक्सिजन आला तर बेड उपलब्ध नसल्याची स्थिती नगर शहरात मंगळवारीही कायम होती. सोमवारी दिवसभरात फक्त वीस मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाल्याने रुग्णांचा जीव पुन्हा टांगणीला लागला होता. मंगळवारी तीन टॅंकर मधून 50 मेट्रिक टनचे तीन ऑक्सिजन टँकर  नगर ला पोहोचले होते. .

३. नगर शहराबाहेरील मृतांची परवड थांबवा
नगर शहरात कोविडमुळे सोमवारी सुमारे 55 ते 60 व्यक्तींचे मृत्यू झालेत, यापूर्वी प्रशासन कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार महानगर पालिकेमार्फत नगर येथील अमरधाममध्ये करत होते. मात्र सोमवारी अचानक नगर शहराबाहेरील नागरिकांची अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. नगर शहराबाहेरील नागरिकांचे  अंत्यसंस्कार कोणाच्या आदेशाने  थांबवण्यात आले असा सवाल जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे  उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी केला आहे.

४. रुग्णालयांचे होणार फायर ऑडिट
नाशिक येथील ऑक्सीजन गळतीची  घटना आणि ऑक्सिजनचा होत असलेला वापर या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन स्टोअरजचे  तांत्रिक परीक्षण ,वितरण व्यवस्थेची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश नगरच्या  महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

५. महापालिकेच्या दक्षता पथकाने केला साडेतीन लाखांचा दंड वसूल
नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार नगर शहरांत लॉकडाऊन  करण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांवर महापालिकेची चार दक्षता पथके कारवाई करत आहेत. या पथकाने मागील दीड महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि सोशल डिस्टंसिंगचे  पालन न करणाऱ्या सुमारे पाचशे नागरिकांकडून तीन लाख 80 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *