Breaking News

1/breakingnews/recent

फणसाच्या बिया खाण्याचे महत्वाचे फायदे

No comments

 


News24सह्याद्री -

फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार चांगले आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे. 

1. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, फणसाप्रमाणेच फणसाच्या बिया खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. फणसाच्या बिया खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो.


2. जर आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर यासाठी फणसाच्या बिया फायदेशीर आहेत. सर्वात अगोदर या बिया दूधात भिजवून ठेवा आणि नंतर याची बारीक पेस्ट तयार करा. दररोज ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि पाण्याने धूवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.


3. फणसाच्या बियामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आणि इतर सूक्ष्म पोषक घटक असतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि त्वचेचे रोग देखील दूर होण्यास मदत होते. या बियाण्यांचे सेवन केल्यास त्वचेचा ओलावा जास्त राहतो आणि आपले केसही चांगले होतात. फणसाच्या बियामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे आपली दृष्टी चांगली राहते.


4. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी आवश्यक पोषक आहे. व्हिटॅमिन ए असल्याने आपले केसही चांगले राहतात. फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी 6 आणि व्हिटॅमिन-सी असतात. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असते.


5. बऱ्याचवेळी डॉक्टर देखील फणस खाण्याचा सल्ला देतात. दररोज फणस खाल्लाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फणस उच्च रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. नियमितपणे फणस खाल्लाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यात आढळणारे पोटॅशियम हृदयाचे स्नायू मजबूत ठेवतात.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *