Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कालची चिंता मिटली, आजचे काय?

No comments

     News24सह्याद्री -
TOP HEADLINESA


1. कालची चिंता मिटली, आजचे काय? 
शहरातील बहुतांश रुग्णालयांतील ऑक्सिजन मंगळवारी संपत आला होता. मोठ्या प्रयत्नांनंतर ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करण्यात आले. नगरचे माजी जिल्हाधिकारी आणि सध्या एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या डॉ. पी. अन्बलगन यांनी विशेष लक्ष घालून चाकण एमआयडीसीतून टँकर पाठवल्याने बुधवारची चिंता मिटली, पण गुरुवारी ऑक्सिजन कुठून आणायचा हा प्रश्न कायम आहे. 

2. २३८४ रुग्णांची कोरोनावर मात
कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या २३८४ रुग्णांना बुधवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २१ हजार ६२५ झालीये . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७२ टक्के आहे.

३.  शहरातून पन्नास हजारांची देशी दारू जप्त
बेकायदेशीररित्या लपवुन ठेवलेला दारूसाठा तोफखाना पोलिसांनी जप्त केलाय . 47 हजार 424 रुपयांचे संजीवनी देशी दारूचे 19 बॉक्स पोलिसांनी जप्त केले याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात एस यु गोमसाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गोपाळ शर्मा असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे राज्यात विक्रीस प्रतिबंध असताना नगर शहरात भिस्तबाग चौकातील उद्देश वर पान स्टॉल येथे देशी दारूचा साठा लपवून ठेवल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.

4. जिल्हा बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्याची मागणी
अहमदनगर जिल्हा बँकेचे विविध शाखेत अनेक कर्मचारी पॉझिटिव आले असून यामध्ये सात कर्मचाऱ्यांचे निधन झाले . कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांच्या कामकाजाची वेळ कमी करावी.

5. अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक करिमभाई हुंडेकरी यांच्या अपहरण कत्यांनना जन्मठेपेची शिक्षा
नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीन बाई हुंडेकरी यांचे कोटला परिसरातून अपहरण झाले होते त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी त्यांची माहिती काढून झाल्यानंतर काही तासातच यांची सुखरूप सुटका करून आरोपी अजहर मंजूर शेख निहाल व बाबा मुश्रफ शेख यांना अटक केले होते. पोलीस अधीक्षक सागर पाटील व पोलीस उपाध्यक्ष संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पिंगळे यांनी तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *